अशोक चव्हाण मरखेलमध्ये  
महाराष्ट्र बातम्या

आग लावणारी मंडळी भाजपमध्ये- अशोक चव्हाणांचा घणाघात

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या काळात मी या मतदारसंघासाठी ५४ विकासाची कामे मंजूर केली. अंतापूरकरांच्या पश्चात राहिलेली कामे करण्यासह येत्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमधून जवळपास १०० कोटींची कामे मी देगलूर- बिलोलीत करणार आहे.

सद्दाम दावणगीरकर

मरखेल (जिल्हा नांदेड) : आरक्षणाचा विषय हा सध्या न्यायप्रविष्ठ असून केंद्र सरकार यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. मंदिर, मस्जिद, ३७० सारखे विषय केंद्र सरकार न्यायालयातून सोडवू शकते, मात्र आरक्षणाच्या विषयावर माघार का? देशातील आरक्षण संपविण्याचा प्रयत्न भाजप व 'आरएसएस'चा असल्याचा आरोप करत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आग लावणारी मंडळी भाजपमध्ये असल्याचे घणाघात मरखेल येथे सोमवारी (ता. २८) केला.

दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या काळात मी या मतदारसंघासाठी ५४ विकासाची कामे मंजूर केली. अंतापूरकरांच्या पश्चात राहिलेली कामे करण्यासह येत्या काळात महाविकास आघाडीच्या सरकारमधून जवळपास १०० कोटींची कामे मी देगलूर- बिलोलीत करणार आहे.

हेही वाचा - गोपी बहू'चा वेगळा अंदाज काही चाहत्यांना पसंत पडला तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलंय.

विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. आमदार मोहन हंबर्डे, अमर राजूरकर, माजी राज्यमंत्री डी. पी. सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, जितेश अंतापूरकर, माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, सभापती संजय बेळगे, रामराव नाईक, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष जनार्धन बिरादार, भाऊसाहेब पाटील मंडलापूरकर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चव्हाण यांनी भाजपवर चौफेर टीका करत पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन केले. तर प्रताप पाटील चिखलीकर हे लोकसभेतील खालून पहिल्या नंबरचे खासदार असल्याचा टोला लगावला. यावेळी चव्हाण यांच्या हस्ते परिसरातील साडेनऊ कोटी रुपयांच्या कामांचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटन करण्यात आले.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT