Pune Banner  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena: पुणे शहरात सत्तासंघर्षावर बॅनरबाजी, पोस्टरमध्ये थेट सरन्यायाधीशांना...

राज्यात सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून कोर्टाने निकाल राखून ठेवला

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसापासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राज्यात सत्तांतर झालं. एकनाथ शिंदे आणि समर्थक आमदार आणि खासदार यांनी सत्तेतून बाहेर पडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेना खरी कोणाची हा वाद समोर आला त्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना ही नाव आणि पक्षचिन्हं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं. परंतु यासंबधीचा वाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे. दोन्ही गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले असून सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. तर पुण्यात याच पार्श्वभूमीवर पोस्टर झळकले आहेत.

सत्तासंघर्षाची सुनावणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांचा खंडपीठाकडे सुरु होती. ही सुनावणी गुरुवारी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने निकाल राखून ठेवला. परंतु या प्रकरणात पुणे शहरात बॅनर लावण्यात आले आहे. त्यातून देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पुणेरी स्टाईलने विनंती राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून न्यायाधीशांना बॅनर मार्फत विनंती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून लावलेल्या या बॅनरमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना लोकशाही वाचवण्यासाठी विनंती देखील केली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल न्यायाच्या बाजूने द्या, असं राष्ट्रवादी युवक काँग्रेसने म्हंटलं आहे. सध्या शहरात हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

काय लिहलं आहे बॅनरमध्ये?

जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपला भारत देश ओळखला जातो. आपण सर्व जाती धर्मातील लोक हे गर्वाने सांगतो. परंतु अलीकडच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा केलेला गैरवापर आदी गोष्टींमुळे आपल्या देशात खरच लोकशाही उरली का? असा देशील प्रश्न पडतो. दिवसा ढवळ्या लोकशाही गाडून टाकण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या जनतेने उघड डोळ्यांनी पाहिले आहे.

सत्ताधारी दडपशाहीने अधिकारांचा गैरवापर करुन हुकूमशाहीला पूरक असे वातावरण करत आहेत. अशा परिस्थितीत तमाम भारतातील जनता आपल्याकडे न्यायाची आस लावून बसली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा लढा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून अंत्यत महत्वाचा आहे. आपण लोकशाही वाचवण्यासाठी योग्य तो निर्णय द्याल, याची खात्री आहे. अन्यथा भारतातील हुकूमशाहीची ही सुरुवात असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT