zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! नववर्षात राज्यातील सर्व शाळांमधील पटसंख्येची एकाचवेळी होणार पडताळणी; महसूल, शिक्षण विभागाचे असणार अधिकारी; बोगस पटसंख्येचा होणार पर्दाफाश

शिक्षक भरतीत जास्त पदे मिळावीत, सध्याच्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणीही अतिरिक्त होऊ नये, यासाठी पटसंख्येची जुळवाजुळव केली जाते. विद्यार्थी शाळेत येत नसताना त्यांचे प्रवेश घेऊन त्यांची दैनंदिन हजेरी लावली जाते. असे गैरप्रकार शोधण्यासाठी उपसंचालकांसह सर्व शिक्षणाधिकारी व महसूलसह शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी राज्यातील सर्व शाळांना एकाचवेळी अचानक भेटी देणार आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : शिक्षक भरतीत जास्त पदे मिळावीत, सध्याच्या कार्यरत शिक्षकांपैकी कोणीही अतिरिक्त होऊ नये, यासाठी पटसंख्येची जुळवाजुळव केली जाते. विद्यार्थी शाळेत येत नसताना त्यांचे प्रवेश घेऊन त्यांची दैनंदिन हजेरी लावली जाते. असे गैरप्रकार शोधण्यासाठी उपसंचालकांसह सर्व शिक्षणाधिकारी व महसूलसह शासनाच्या अन्य विभागातील अधिकारी राज्यातील सर्व शाळांना एकाचवेळी अचानक भेटी देणार आहेत. शासनाच्या मान्यतेनुसार त्याचे नियोजन निश्चित झाले आहे, पण तारीख अजून ठरलेली नाही.

राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी भेटी देण्याच्या नियोजनाला शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार आता शिक्षण विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी शाळांना भेटी देतील. त्यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि हजेरीपत्रकावर नोंदविलेले विद्यार्थी, याची पडताळणी होईल. विद्यार्थी गैरहजर असतानाही त्याची हजेरी लावली असल्यास त्या शिक्षकासह मुख्याध्यापकावर कारवाई केली जाणार आहे. हजेरी पत्रकावर विद्यार्थी २०, ५० आणि प्रत्यक्षात उपस्थित १५, २० विद्यार्थी असतील तरी त्याचीही काटेकोर पडताळणी होईल.

प्रत्येक जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या एकाचवेळी पडताळण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात विविध विभागातील अधिकाऱ्यांची पथके तयार करतात. संचमान्यतेनुसार शिक्षकांच्या प्रमाणात त्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत का, याची पडताळणी यावेळी केली जाणार आहे.

जानेवारीत अंतिम होणार संचमान्यता अन्‌...

२०२५-२६ या शैक्षणिक वर्षाची संचमान्यता पुढील दहा दिवसांत पूर्ण होईल. त्यानंतर रिक्त, अतिरिक्त शिक्षकांची संख्या समोर येईल. पटसंख्येअभावी अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे रिक्त पदांवर समायोजन केले जाणार आहे. पटसंख्ये संदर्भातील १५ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार २० पेक्षा कमी पटाच्या शाळा तथा वर्ग (इयत्ता नववी व दहावी) बंद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पटसंख्येची अट शिथिल करावी, असा प्रस्ताव संचालक कार्यालयातून शासनाकडे गेला आहे, पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे कमी पटाच्या शाळा तथा वर्गांवरील शिक्षकांची चिंता कायम आहे.

जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात देऊ शकतात विविध विभागांचे अधिकारी

संचमान्यतेपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने त्यांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची माहिती भरली आहे. त्यानंतर केंद्रप्रमुखांकडून माहितीची पडताळणी झाली आणि गटशिक्षणाधिकारी फेरपडताळणी झाली आहे. सर्व शाळांची एकाचवेळी विशेष पटपडताळणी होणार असल्याने सर्वांना वस्तुनिष्ठ माहिती भरायला सांगितले होते. आता शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांची पडताळणी होईल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhigwan Kidnapping Case : भिगवणमधील तरुणीच्या अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट, तरुणी महिन्याभरापासून आरोपींच्या संपर्कात, पोलिसांची माहिती

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये दाेन दिवस वाहतूक मार्गांत बदल; छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, दोन्ही बाजूंचे सर्व्हिस रोड बंद!

Weather Update: हवामान कृती ही आर्थिक किल्ली, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Jalgaon Police : पोलिस दल पेट्रोलपंप प्रकरण : एक कोटी 33 लाख घेऊन उपनिरीक्षक पसार; 'वेल्फेअर' पोलिस निरीक्षक, लेखा परीक्षक संशयाच्या फेऱ्यात

Ayodhya Temple: राम मंदिरानंतर अयोध्येची ‘सुवर्ण’ झेप; IIM अहवालात अर्थव्यवस्थेची विक्रमी वाढ उघड

SCROLL FOR NEXT