airport sakal
महाराष्ट्र बातम्या

नववर्षात सोलापूरकरांना मिळणार ‘उडान’चे गिफ्ट! होटगी रोड विमानतळ सुरु करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली; खासदार महास्वामींचे प्रयत्न

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे विमानसेवेसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यांनी विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक घेऊन अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या. नववर्षात सोलापूर विमानतळावरून ‘उडान’अंतर्गत विमानसेवा शक्य होईल, असे चित्र आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत सोलापूर विमानतळावरील विमानसेवा डिसेंबरपासून सुरू व्हावी, यासाठी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यादृष्टीने त्यांनी विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी प्रलंबित कामे नोव्हेंबरअखेर पूर्ण करावीत, अशा सूचना केल्या. पण, प्रलंबित कामाची स्थिती पाहता नववर्षात सोलापूर विमानतळावरून ‘उडान’अंतर्गत विमानसेवा शक्य होईल, असे चित्र आहे.

शनिवारी (ता. ७) खासदार डॉ. महास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली विमानतळ प्राधिकरण समितीची बैठक पार पडली. यावेळी समितीचे सदस्य विक्रम देशमुख, राजशेखर हत्ती, उद्योजक राम रेड्डी, डॉ. अग्रजा वरेरकर- चिटणीस आदी उपस्थित होते. विमानेसवा सुरु होण्यासाठी यापूर्वी १०, १४ जुलै, २३ ऑगस्ट व ६ सप्टेंबर रोजी बैठका पार पडल्या आहेत. प्रत्येक विभागांच्या अधिकाऱ्यांनी विलंब न करता मर्यादित वेळेत पूर्ण करावीत.

केंद्रीय विमान उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी सोलापूरची विमानसेवा तातडीने सुरु करावी, यासाठी वेळावेळी पत्रव्यवहार केला असून त्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रलंबित कामे पूर्ण झाल्यानंतर तत्काळ परवान्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, अशी लेखी ग्वाही दिल्याचेही खासदार डॉ. महास्वामींनी यावेळी सांगितले. त्यानुषंगाने प्रलंबित व सुरु असलेली कामे मर्यादित वेळेत पूर्ण होण्यासाठी आवर्जुन ही बैठक घेण्यात आली होती. प्राधिकरणाने संपादित केलेल्या जमिनीपैकी महाराष्ट्र शासनाच्या नावावरील जमिनीवर भारतीय विमानपतन प्राधिकरणाचे नाव लावणे तसेच प्राधिकरणाच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण दूर करणे, या प्रक्रिया पूर्ण तातडीने पूर्ण कराव्यात, असेही डॉ. महास्वामींनी यावेळी स्पष्ट केले.

महापालिका आयुक्तांना सूचना तर जिल्हाधिकाऱ्यांचे कौतूक

विमानतळावरील स्थानिक सुविधा म्हणजे नळ व ड्रेनेज कनेक्शन, कचरा व्यवस्थापन अशी कामे महापालिका आयुक्तांनी तातडीने पूर्ण करून द्यावीत. तर महसुली नोंदीसंदर्भात युद्ध पातळीवर काम करुन रखडलेली प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाचे कौतूक खासदार डॉ. महास्वामींनी केले.

खासदार डॉ. महास्वामींनी दिली डेडलाईन...

  • - महावितरणच्या सात इलेक्ट्रिक पोलची ऊंची कमी करण्याची कार्यवाही ऑक्टोबरअखेरीस पूर्ण करा

  • - बीएसएनएलच्या टॉवरची ऊंची कमी केली असून सोलापूर रेल्वेच्या मास्टची ऊंची कमी करावी

  • - विमानतळाचा रन-वे व संरक्षण भिंतीसह सुमारे ४३ कोटींची कामे नोव्हेंबरमध्ये पूर्ण करावीत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT