Corona 3rd wave sakal
महाराष्ट्र बातम्या

तिसऱ्या लाटेत 'या' वयोगटातील मुलांना सांभाळा

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट ऑक्‍टोबरमध्ये येऊ शकते असा ईशारा देण्यात आला आहे

तात्या लांडगे

सोलापूर : लंडन, युके याठिकाणी कोरोनाची (Corona) दुसरी लाट येऊन गेल्यानंतर दोन महिन्यांनी आपल्याकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आता त्यांच्याकडे तिसरी लाट (Third Wave) येऊन गेली असून भारतात तथा महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट साधारणपणे सप्टेंबर अखेरीस किंवा ऑक्‍टोबरच्या पहिल्या अथवा चौथ्या आठवड्यात येईल, असा अंदाज वर्तविला गेला आहे. कानपूर आयआयटी आणि इंडियन मेडिकल कौंन्सिल (आयसीएमआर) यांनी त्यासंदर्भातील अभ्यास केला आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत राज्यातील 64 लाख 57 हजार व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या. तर चिंतेची बाब म्हणजे राज्यातील एक लाख 37 हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. अजूनही नगर, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्यांमधील ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी झालेली नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट तीव्र होती. हॉस्पिटलमधील खाटा हाऊसफुल्ल झाल्याने अनेकांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत.

आता तिसऱ्या लाटेत तशी परिस्थिती ओढावू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच जय्यत तयारी सुरू केली आहे. ऑक्‍सिजन निर्मिती व साठवण क्षमता दुप्पट-अडीचपट केली असून रुग्णालयांमधील खाटाही वाढविल्या आहेत. परंतु, निर्बंध शिथिल केल्यानंतर बेशिस्तपणे गर्दीच्या ठिकाणी फिरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रावेळी गर्दी होऊ नये म्हणून राज्य पातळीवरून या काळात निर्बंध कडक करण्याचेही नियोजन सुरु आहे.

कानपूर आयआयटी आणि इंडियन मेडिकल कौंन्सिलच्या अभ्यासातील निष्कर्षानुसार कोरोनाची तिसरी लाट सप्टेंबरअखेरीस अथवा ऑक्‍टोबरमध्ये येईल, असा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकांनी कुटुंबातील लहान मुलांची काळजी घ्यावी. शासकीय पातळीवरून कृती आराखडा तयार करून ठोस नियोजन केले जात आहे. - डॉ. दिलीप म्हैसकर, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई

दुसऱ्या लाटेपेक्षा तीव्रता कमीच

कानपूर आयआयटीने वर्तविलेला दोन्ही लाटेतील अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. दुसरीकडे इंडियन मेडिकल कौंन्सिलेही दोन्ही लाटेचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेचा अंदाज बांधला आहे. कानपूर आयआयटीतील तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनाची तिसरी लाट ऑक्‍टोबरच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून सुरु होऊ शकते.

तर इंडियन मेडिकल कौंन्सिलच्या अंदाजानुसार ही लाट सप्टेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून येऊ शकते. परंतु, दोन्ही लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी असणार आहे. एक ते सहा आणि सात ते 12 व 12 ते 18 वयोगटातील बालके सर्वाधिक बाधित होतील, असेही त्यांचे मत आहे. को-मॉर्बिड रुग्णांनाही कोरोनाचा धोका असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT