solapur zp

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

पहिल्याच सभेत झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांनी घेतला शिक्षणाधिकाऱ्यांचा तास! शिक्षकांना शिस्त लावा, शाळेत थांबण्याची सक्ती करा, शिक्षणाधिकारी म्हणाले...

अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषद कामकाजाचा आज पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शिस्त लावण्याच्या सूचना केल्या.

तात्या लांडगे

सोलापूर : अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर जिल्हा परिषद कामकाजाचा आज पहिलाच दिवस होता. पहिल्याच दिवशी अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिक्षणाधिकारी कादर शेख यांना प्राथमिक शाळेतील शिक्षकांना शिस्त लावण्याच्या सूचना केल्या. शाळेच्या वेळेत शाळेतच थांबावे, त्यांची कामे शाळेच्या वेळेनंतर करावीत, असे सांगत जे शिक्षक मुख्यालयात (ज्या ठिकाणी नियुक्ती आहे) राहत नाहीत, अशा शिक्षकांची यादी सभेत सादर करण्याच्या सूचना केल्या. यावर शिक्षणाधिकारी शेख यांच्याकडे हो म्हणण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष आज पहिल्याच दिवशी अभ्यासासह अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सत्कार स्वीकारण्यात व्यस्त होते. अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटना सत्कार करत सहकार्य करण्याचे आश्वासन देत होते. याच वेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह शिक्षण विभागाच्या पूर्ण टीमच्या वतीने अध्यक्ष वैद्य व उपाध्यक्ष पवार यांचा सत्कार झाला.

सत्कारानंतर उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी शिक्षणाधिकारी शेख यांना सांगितले की, शहराच्या शेजारील तालुक्यातील प्राथमिक शाळेतील अनेक शिक्षक शाळेत राहत नाहीत. विशेषतः दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या तालुक्यातील शिक्षक हजेरीपुरते शाळेत जातात, त्यानंतर ते त्यांच्यासाठी महत्त्वाची असलेली कामे करतात. यामध्ये शिस्त येणे आवश्यक आहे. अनेक शिक्षक असे आहेत, ते नियुक्ती असलेल्या ठिकाणी राहत नाहीत. शासनाने नियमही केला आहे की, ज्या शाळेत नियुक्ती आहे, त्याच ठिकाणी राहावे; पण तसे दिसत नाही. याबाबत आपण सभेच्या दिवशी मुख्यालयी राहत नसलेल्या शिक्षकांची यादी सादर करावी, अशा सूचना दिल्या.

आम्ही दोघे सरळ स्वभावाचे...

आम्ही दोघेही सरळ आहोत. आम्हाला प्रत्येक गोष्ट नाही सांगितली तरी चालेल; पण जे चुकीचे आहे, त्याबाबत तुम्ही दखल घ्या, शिस्त लावा, इतकीच अपेक्षा आहे. आम्हाला अधिकाऱ्यांना बोलून चमकोगिरी करायची नाही, पेपरात बातमी छापायची नाही. यामुळे शिक्षकांना शिस्त लावण्याची गरज आहे. त्यामुळे आपण आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्या, अशा सूचना उपाध्यक्ष पवार यांनी केल्या.

‘त्या’ इमारतींची यादी करा...

मागील वर्षी पावसाळा मोठा होता. जिल्ह्यात आजही अनेक शाळा जीर्ण झालेल्या आहेत. अनेक खोल्या धोकादायक आहेत. यावर आपण अशा शाळांची यादी करावी. या सर्व शाळांमध्ये गावातील शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेतात. एखादी दुर्घटना होण्यापूर्वी आपण यावर सर्वांनी काम केले पाहिजे. ज्या वर्गखोल्या धोकादायक आहेत, त्याठिकाणी नवीन खोल्यांसाठी आपण निधी उपलब्ध करणार असल्याचेही उपाध्यक्ष पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय

T20 WC, IND W vs SA W: भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Khadakwasla Rain Update: खडकवासला धरण परिसरात तासाभरात ३० मिमी पाऊस; पाणीसाठ्यात वाढ नाही, रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी

Sangli Crime Twist: वेदांत बंडगर खून प्रकरणाला नवे वळण; कुख्यात गुंड म्हमद्या नदाफ अटकेत, पोलिस कोठडीचे अधिकार राखून कारागृहात रवानगी

Paithan Road Crash : पैठण तालुक्यात भीषण अपघात; भरधाव पिकअपच्या धडकेत एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, दोन बालकांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT