Union Budget 2023 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Union Budget 2023: "अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा; निवडणुका नाहीत म्हणून तोंडाला पुसली पानं"

केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलं

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळातील पाचवं आणि शेवटचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही राजकीय वर्तुळातून यावर कौतुक केले जात आहे तर काही नेत्यांकडून टीका देखील केली जात आहे.

यंदाच्या सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना, गरिबांना हद्दपार केल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत व्हावी, ग्रामीण भागात रोजगार निर्माण व्हावा, यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही असंही त्यांनी म्हंटलं आहे.

तर देशाचा मुख्य कणा असणाऱ्या ओबीसी समाजासाठी, आदिवासी आणि एसी वर्गाच्या योजनांना या अर्थसंकल्पातून कात्री लावली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. डिजिटलायझेशनवर केवळ भर दिला असून निवडणुका नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प सादर केलेले आहे. तर निवडणुका नसल्याने महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

उपेक्षित घटकासाठी ठोस उपाययोजना दिसत नाही. या अर्थसंकल्पात मोजक्या उद्योगपतींसाठी पायघड्या घातल्या आहेत. रोजगार हमीची व्याप्ती वाढली पाहिजे होती. निवडणुका नजरेसमोर ठेवून हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. देशाचा विकास यातुन साधला पाहिजे. या सरकारने येत्या निवडणुकाच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प जाहीर केला आहे असंही वडेट्टीवार यावेळी म्हणाले आहेत.

तर शेतकऱ्यांसाठी समाधानासारख्या उपाययोजना केल्या नाहीत. उत्पन्नावर त्यांनी मर्यादा आणल्या आहेत. उत्पन्न वाढवून काय होणार त्याचे दाम त्याला कसं मिळणार हे पहिले पाहिजे होते. या अर्थसंकल्पात काही मोठ्या उद्योगपतींच्या दृष्टिकोनातून उपाययोजना दिल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याला त्यांनी भोपळा दिला आहे. यावर्षी अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला भोपळा मिळाला आहे. पुढच्या वर्षी निवडणुका असतील तर भोपळ्यापेक्षा मोठी वस्तु असेल तर टी देतील. पण यावर्षी मात्र निवडणुका नाहीत म्हणून महाराष्ट्राच्या तोंडाला केवळ पानं पुसली आहेत आणि भोपळा हाती दिला आहे. तर या अर्थसंकल्पाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 100 पैकी 35 गुण दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT