income tax department 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात 1050 कोटींचे संशयास्पद व्यवहार; आयकर विभागाचा मोठा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

काही सरकारी अधिकाऱ्यांनी विशिष्ट मंत्रालयातील विशिष्ट पद मिळविण्यासाठी मोठी रोख रक्कम दिल्याचे कंत्राटदारांबरोबर व्यवहार झाल्याचेही पुराव्यांमधून दिसून येत आहे.

मुंबई - प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात २३ तारखेला राज्यात काही उद्योगपती आणि दलालांच्या, तसेच सरकारी पदांवरील काही जणांशी संबंधित ठिकाणी छापे टाकले. गेल्या सहा महिन्यांत मिळालेल्या माहितीच्या आधारावर ही कारवाई करण्यात आल्याचे प्राप्तिकर विभागाने आज जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

प्राप्तिकर विभागाच्या या पत्रकानुसार, सप्टेंबरमध्ये केलेल्या या कारवाईत २५ निवासस्थाने आणि १५ कार्यालयांमध्ये तपास मोहिम राबविण्यात आली. मुंबईतील हॉटेल ओबेरॉयमधील दोन अलिशान खोल्या दोन दलालांनी कायमस्वरुपी आरक्षित करून ठेवल्या असून त्यांचा वापर विविध प्रकारच्या बैठकांसाठी केला जातो. या ठिकाणीही शोधमोहिम राबविण्यात आली. या सर्व संशयितांनी व्यवहार करताना सांकेतिक नावांचा वापर केल्याचे दिसून आले असून काही व्यवहारांच्या नोंदी १० वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यांनी एकूण तब्बल एक हजार पन्नास कोटी रुपयांचे व्यवहार केल्याचेही आढळून आले आहे.

'हे दलाल विविध कंपन्या आणि उद्योजकांना जमीन मिळवून देण्यापासून ते सर्व सरकारी परवानग्या मिळवून देण्यापर्यंत सर्व प्रकारची सेवा देतात. सर्व संशयितांनी सांकेतिक नावांचा वापर केला असला तरी एक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक उपकरण हाती लागले असून त्यातून अनेक पुरावे मिळलो आहेत. या पुराव्यांमध्ये व्यवहारात वापरलेली रोख रक्कम, त्याचे वितरण आणि व्यक्ती याबाबत माहिती आहे. काही सरकारी अधिकाऱ्यांनी विशिष्ट मंत्रालयातील विशिष्ट पद मिळविण्यासाठी मोठी रोख रक्कम दिल्याचे कंत्राटदारांबरोबर व्यवहार झाल्याचेही पुराव्यांमधून दिसून येत आहे.

या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे प्राप्तिकर विभागाने सांगितले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवरील छाप्याची चर्चा आज सुरू असतानाच पंधरा दिवसांपूर्वीच्या वेगळ्या प्रकरणातील छाप्याची माहिती नेमकी आजच प्रसिद्धीस देण्याचे टायमिंग प्राप्तिकर खात्याने साधल्याचीही चर्चा होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: पुढील ५ दिवस महत्त्वाचे! नोव्हेंबरमध्येही कोसळणार मुसळधार; हवामान विभागाचा अलर्ट

Latest Marathi News Live Update : शेतकरी आंदोलन थोड्याच वेळात संपणार

Akola News: अकोला जिल्ह्याची सुपीकता घटली; सूक्ष्म अन्नद्रव्यांची तीव्र कमतरता, अभ्यासातून चिंताजनक निष्कर्ष

Female Cancer: तरुण महिलांमध्ये कर्करोगाचे वाढते प्रमाण; स्तन कर्करोगाविषयी जागरूकता ही काळाची गरज !

Wardha Crime: नातीने केली आजीच्या घरी चोरी; चोरीच्या मुद्देमालातून खरेदी केली कार, दुचाकी, आयफोन

SCROLL FOR NEXT