NCP Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: शरद पवार गटात इनकमिंग सुरूच; पवारांच्या उपस्थितीत झाले प्रवेश

सकाळ डिजिटल टीम

Ncp News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्राचा विकास होऊ शकतो या भावनेने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते पक्ष प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयामध्ये विविध पक्षप्रवेश पार पडले आहे. अखिल भारतीय बंजारा समाजाचे नेते रविकांत राठोड यांच्यासह त्यांच्या संघटनेच्या ३६ जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

तर दुसरा पक्षप्रवेश रिपब्लिकन पार्टी खरात गट प्रदेश उपाध्यक्ष टिपू पटवेगार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज पक्षप्रवेश केला आहे तर तिसरा पक्षप्रवेश बीड जिल्ह्यातील परळी येथील शेतकरी संघटनेच्या नेते बबनराव विठ्ठलराव आपे, प्रताप नानासाहेब शिंदे यांनी पक्ष प्रवेश केला आहे. तर चौथा पक्षप्रवेश पुणे जिल्ह्यातील डॉ. विवेक बिंदूराव क्षीरसागर, पुणे जिल्हा सहकारी दूध महासंघाचे निवृत्त व्यवस्थापक संचालक यांनी शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या सर्वांनी पक्ष प्रवेश केला आहे.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रीय महासचिव जितेंद्र आव्हाड, सरचिटणीस रवींद्र पवार, प्रवक्त्या विद्याताई चव्हाण, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रीय प्रवक्ते नसीम सिद्दिकी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Are you Indian? तुमच्या देशात चालते व्हा...; अमेरिकन नागरिकाकडून भारतीय दाम्पत्याला अपमानास्पद वागणूक, VIDEO VIRAL

Sugarcane Payment: ऊस बिलासाठी महिलांनाही रस्त्यावर काढावी लागली रात्र; गोकुळ शुगरने १३० कोटी रुपये थकविले, २०० शेतकऱ्यांचा दोन दिवसांपासून ठिय्या

Video : अखेर राकेशचं खरं रूप अंजलीसमोर येणार ! मालिकेतील ट्विस्टने प्रेक्षक खुश, म्हणाले..

Mira Road: बकरी ईदच्या कुर्बानीला बकरा आणला, विरोध म्हणून हिंदुत्ववाद्यांनी डुक्कर आणलं; मिरा रोड परिसरात तणाव, VIDEO VIRAL

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलणार? काँग्रेस वापरणार भाजपचा 'बिहार पॅटर्न'

SCROLL FOR NEXT