दारू पिऊ नका sakal
महाराष्ट्र बातम्या

विदेशी दारू अन् बिअरचा वाढला खप! दुष्काळी जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख, पण एका वर्षात १०१२ कोटींची मद्यविक्री; कोट्यवधींची अवैध हातभट्टीही जप्त

सोलापूर शहर-जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने दिली. त्यात देशी दारू ३३९ कोटींची, विदेशी दारू ६३८ कोटी रुपयांची व बिअर व वाईनची ३५ कोटी रुपयांची विक्री झाली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर शहर-जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने दिली. त्यात देशी दारू ३३९ कोटींची, विदेशी दारू ६३८ कोटी रुपयांची व बिअर व वाईनची ३५ कोटी रुपयांची विक्री झाली आहे. दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ही मद्यविक्री आजवरील विक्रमी आहे हे विशेष.

सोलापूर जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात एकूण सव्वादोन कोटींहून अधिक लिटर मद्यविक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात देशी दारुची विक्री जवळपास तीन लाख लिटरने कमी झाली आहे. पण, आठ लाख लिटरने विदेशी दारुची विक्री वाढल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे झाली आहे. तसेच बिअरची विक्री २०२२-२३च्या तुलनेत सात लाख लिटरने वाढली आहे.

वाईनची विक्री पाच हजार ७१३ लिटरने वाढल्याचीही नोंद आहे. २०२२-२३मध्ये जिल्ह्यात देशी दारूची विक्री ८७ लाख ४३ हजार लिटर तर विदेशी दारूची विक्री ७८ लाख नऊ हजार लिटर इतकी झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकून १२ महिन्यांत जवळपास साडेतीन ते चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांनीही अवैध हातभट्टीच्या ठिकाणांवर अशीच कारवाई केली आहे.

२०२३-२४ मधील मद्यविक्री

  • दारू लिटरमध्ये विक्री अंदाजे किंमत

  • देशी दारू ८४.७५ लाख लिटर ३३९ कोटी

  • विदेशी दारू ८६.१९ लाख लिटर ६३८ कोटी

  • बिअर ६५.०५ लाख लिटर २५.५९ कोटी

  • वाइन १,१४,२३९ लिटर १० कोटी

  • एकूण २.३८ कोटी लिटर १०१२.५९ कोटी

उत्पादन शुल्क विभागाला १५० कोटींचा महसूल

२०२३-२४ या आर्थिक वर्षात सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मद्यविक्रीतून १५० कोटींपर्यंत महसूल मिळाला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. अवैध वाहतूक, अवैधरीत्या मद्यविक्री, निर्मितीवर देखील आमच्या पथकांचे लक्ष आहे. आता निवडणूक काळात सर्व मद्यविक्री दुकानांना दररोजच्या विक्रीची माहिती द्यावी लागणार आहे.

- नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सोलापूर

परराज्यातून येणाऱ्या दारूवर विशेष लक्ष

लोकसभा निवडणुकीच्या काळात परराज्यातून अवैधरीत्या दारू येणार नाही, याची खबरदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी सहा पथके नेमण्यात आली आहेत. नांदणी, मरवडे, वागदरी याठिकाणी सीमा तपासणी नाके सुरु केले असून त्याठिकाणी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरही छापेमारी सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शक्तीचा महाराष्ट्राच्या किनारपट्टीला धोका नाही, पण मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता; IMDने दिला इशारा

Crime News: अमेरिकेतील डल्लासमध्ये भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; हैदराबादच्या चंद्रशेखर पोलच्या मृत्यूने भारतात हळहळ

Latest Marathi News Live Update: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर

Sakal Premier League : 5 नोव्हेंबरपासून 'सकाळ प्रिमिअर लीग'चा थरार; विजेत्या संघाला तीन लाखांचा पुरस्कार, ३२ संघ होणार सहभागी

PMC Elections : कोठे तक्रारींची दखल; कोठे राजकीय सोय, अंतिम प्रभागरचना जाहीर; इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे

SCROLL FOR NEXT