महाराष्ट्र बातम्या

ई-संजीवनीद्वारे रुग्ण तपासणीच्या वेळेत वाढ, 6000 पेक्षा अधिक रुग्णांना लाभ

भाग्यश्री भुवड

मुंबई:  कोरोनामुळे लॉकडाऊन काळात सामान्य नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी ऑनलाईन सल्ला घेता यावा यासाठी सुरु झालेल्या ई-संजीवनी ओपीडीच्या माध्यमातून राज्यभरात आतापर्यंत 6000 पेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी दिवसातून दोन वेळेस ओपीडी देखील सुरु करण्यात आली आहे. यापूर्वी सकाळी 9.30 ते दु.1.30 या वेळेतच रुग्णांना ऑनलाईन सल्ला दिला जायचा आता त्यात वाढ करुन दु.3.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत देखील ओपीडी सुरु असणार आहे.

या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचे मोबाईल ॲप देखील सुमारे 4 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आले आहे. ॲण्ड्राईड आधारीत ॲप असल्याने त्याचा फायदा स्मार्ट फोन धारकांना होत आहे.

राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यामध्ये पूर्णपणे सुरू करण्यात आली. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट दिल्यास त्यांना तज्ज्ञांचा सल्ला घेता येतो. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप, मोबाईल यांचा वापर करून कुठल्याही आजारावर वैद्यकीय सल्ला, उपचार रुग्णाला घेता येतो. राज्यभरात आतापर्यंत 6072 जणांनी यासेवेचा लाभ घेतला आहे.

ॲप डाऊनलोड करण्यासाठी लिंक:
https://play.google.com/store/apps/details?id=in.hied.esanjeevaniopd&hl=en_US

ई-संजीवनी ओपीडी ॲप :

  • मोबाईल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर ‘ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून रुग्ण त्याचा नोंदणी अर्ज भरतो. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो.
  • लॉगईनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगईन करता येते.
  • डॉक्टरांशी चर्चेनंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.
    ---------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Increased patient screening time e-resuscitation benefiting more than 6 thousand patients

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Former CJI Bhushan Gavai Letter To President Murmu : "न्यायव्यवस्थेत एकाच समाजाला झुकते माप!" माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र; ओबीसी-वंचितांच्या प्रतिनिधित्वावरून गंभीर चिंता

अवघ्या ४८ तासांत शनी-गुरूची चाल बदलणार! १२ राशींचं नशीब पालटणार? कोणाला होणार फायदा?

Delimitation Bill: 'डिलिमिटेशन'ची विरोधकांना एवढी भीती का वाटते? कपिल सिब्बल, योगेंद्र यादव यांचं नेमकं म्हणणं काय?

डिलिमिटेशन विधेयकाबाबत DMK ची भूमिका अखेर स्पष्ट, भाजपच्या अडचणी वाढणार? नेमकं काय घडतंय?

IPL 2027: रोहित शर्माशिवाय पर्यायच नाही...! Mumbai Indians चाहत्यांची कॅप्टन्सीबाबतची उत्सुकता संपली

SCROLL FOR NEXT