Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ind vs Aus Final : ''मोदी बॉलिंग करतील अन् अमित शाह बॅटिंग'', संजय राऊतांनी साधला निशाणा

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी होत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत बघण्यासाठी देशभरातील क्रिकेटप्रेमी टीव्हीसमोर आहेत. या क्रिकेट सामन्यावरुन ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आणि भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांवर टीकास्र सोडलं आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मी क्रिकेट मॅच बघत नाही. भारत जिंकावा , अशाच सगळ्यांच्या अपेक्षा आहेत. परंतु भाजपचे लोक क्रिकेटचाही इव्हेंट करीत आहेत. भारत जिंकल्यानंतर मोदींमुळे जिंकलो, अशा प्रतिक्रिया ते देतील.

राऊत पुढे म्हणाले, सध्या आपल्याला असं भासवलं जातंय की, अमित शाह बॅटिंग करतील.. मोदी बॉलिंग करतील आणि भाजपचे लोक फिल्डिंग करत आहेत. मोदी होते म्हणूनच आपण जिंकलो, अशा प्रतिक्रिया आल्या तर नवल वाटू नये.

''भाजपकडून खेळाचाही राजकीय इव्हेंट केला जात आहे. मोदींमुळे असे चेंडू वळले, अशी गुगली पडली, अमित शाह स्टंपच्या मागे उभं राहून सांगत होते, अशा प्रतिक्रिया येऊ शकतात'' अशी उपहासात्मक टीका संजय राऊतांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Ram Temple: अयोध्येत राम मंदिर परिसरात नमाज पठण करण्याचा प्रयत्न! विश्वस्त मंडळाकडून सुरक्षा व्यवस्थेत होणार मोठे बदल

विरोधात उभा रहायची हिंमत कशी केलीत? पिंपरीत भाजप कार्यकर्त्यांचा मध्यरात्री राडा, घरात घुसून शिवीगाळ

ताजमहालचे खास तळघर उघडणार! मोफत पाहण्याची एकमेव संधी; जाणून घ्या ३ दिवसांचे वेळापत्रक

Maharashtra Dry Day राज्यात २९ ठिकाणी ४ दिवस ड्राय डे, १३ ते १६ जानेवारीपर्यंत मद्यपानास मनाई

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

SCROLL FOR NEXT