Indapur Vidhan Sabha Election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Harshvardhan Patil: दत्ता भरणेच लढणार इंदापूरची जागा? भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे हर्षवर्धन पाटलांची गोची

Datta Bharane: हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करण्याच्या आधी अजित पवार यांनी विधानसभेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची उट ठेवली होती.

आशुतोष मसगौंडे

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. यावेळी महायुतीतून भाजपच्या वाट्याला 5 जागा येणार आहेत. या पाच जागांवर कोणाला संधी द्यायची यासाठी महाराष्ट्र भाजपने 10 नावे केंद्रीय समितीकडे पाठवली आहे.

महाराष्ट्र भाजपने पाठवलेल्या या 10 नावांमध्ये इंदापूरचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नावाचाही समावेश आहे. जर विधान परिषदेसाठी हर्षवर्धन पाटील यांचे नाव भाजपच्या केंद्रीय समितीने मान्य केले तर हर्षवर्धन पाटील यांची यावेळी विधानसभा निवडणूक लढण्याची संधी हुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाही नुकतेच महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या आमदार दत्ता भरणे यांना इंदापूरातून विधानसभा निवडणूक लढण्याची संधी मिळणार आहे.

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत बारामतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना मदत करण्याच्या आधी अजित पवार यांनी विधानसभेबाबत भूमिका स्पष्ट करण्याची उट ठेवली होती. त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावर मध्यस्थी केल्यानंतर पाटील यांनी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला होता.

विधान परिषदेसाठी भाजपने कोणाची नावे पाठवली?

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी 10 नावे केंद्राकडे पाठवण्यात आले आहे. यातील 5 नावांवर आज किंवा उद्या निर्णय होण्याची शक्यता आहेत.

बावनकुळे यांनी पाठवलेल्या नावांमध्ये पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ आणि माधवी नाईक यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी; आता रकमेची मर्यादा नव्हे सातबाराच होणार कोरा! राज्यातील २४.७३ लाख शेतकऱ्यांकडे ३५,४७७ कोटींची थकबाकी

सोलापूर शहर पोलिसांची कारवाई! स्वयंघोषित ‘दादा’ 8 दिवसांसाठी होणार तडीपार; महापालिका निवडणुकीपूर्वी ‘या’ गुन्हेगारांची पोलिस ठाण्यांकडून मागविली माहिती

Morning Breakfast Recipe: कुठल्याही पूर्वतयारीशिवाय १५ मिनिटांत सकाळी नाश्त्यात बनवा पेरी पेरी कबाब, सोपी आहे रेसिपी

अग्रलेख - शेजारचा आजार

Railway Station Renamed: महत्त्वाची बातमी! रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातील 'या' रेल्वे स्थानकाचे नाव बदललं; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT