Independence Day 2022 RSS chief Mohan Bhagwat hoists the tricolour at RSS Headquarters in Nagpur  
महाराष्ट्र बातम्या

RSS मुख्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा, मोहन भागवतांनी फडकवला तिरंगा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : आज देशाचा ७५ वा स्वतंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांनी संघटनेच्या नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला. कडेकोट बंदोबस्तात पार पडलेल्या या कार्यक्रमात संघाचे काही स्वयंसेवक आणि प्रचारक उपस्थित होते. Independence Day 2022

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने रेशीमबाग परिसरातील डॉ.हे डगेवार स्मारक समिती येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सायंकाळी ५ वाजता स्वयंसेवक शहरातील विविध भागांत ‘पथसंचलन’ (मार्च पास्ट) करणार आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी शनिवारी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा एक भाग म्हणून संघटनेच्या नागपूर येथील मुख्यालयात तिरंगा फडकवला स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल केंद्र सरकारकडून हा उपक्रम राबवला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या फेसबुक आणि ट्विटर खात्यांचे डिपी देखील राष्ट्रध्वजात बदलले होते. सत्ताधारी भाजपचा वैचारिक जनक असलेल्या आरएसएसने अद्याप तिरंगा डीपी म्हणून का अपलोड केला नाही, असा प्रश्न यापूर्वी सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT