Independence Day Sakal
महाराष्ट्र बातम्या

Independence Day : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर CM शिंदे घेणार इर्शाळवाडीतील नागरिकांची भेट

दत्ता लवांडे

रायगड : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इर्शाळवाडी दुर्घटनेतील पीडित नागरिकांची भेट घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे १९ जुलै रोजी भूस्खलन होऊन अनेकजणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या नागरिकांचे महाराष्ट्र शासनाकडून पुनर्वसन केले गेले आहे.

स्वातंत्र्यदिनाचे ध्वजारोहण झाल्यानंतर या दुर्घटनेतून बचावलेल्या नागरिकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट घेणार असून त्यांना मिळणाऱ्या सोई सुविधांचाही मुख्यमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून ध्वजारोहण करण्यात आले आहे.

दरम्यान, १९ जुलै रोजी झालेल्या या दुर्घटनेमध्ये २८ जण मृत्यू पावले होते. तर मातीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६० जण अडकले होते. तीन ते चार दिवसांचे बचावकार्य केल्यानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करण्यात आलं आणि बचावकार्य थांबवलं होतं. त्यानंतर बचावलेल्या नागरिकांना आर्थिक मदत देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT