Independence Day : कल्याण गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक संजय माळी यांना राष्ट्रपती पदक पुरस्कार जाहीर झाला आहे. गुन्हे शाखेतील माळी यांनी सेवेत 32 वर्षाचा टप्पा पार केला असून या सेवाकाळात 358 बक्षिसे व 12 प्रमाणपत्र मिळाली आहेत. पोलीस शिपाई म्हणून त्यांनी आपल्या सेवेला सुरवात केली. त्यांची नुकतीच पोलीस उप निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली आहे. पदोन्नती आणि राष्ट्रपती पदक प्राप्त झाल्याने माळी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय सेवांसाठी विविध पदके जाहीर करण्यात आली आहेत. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरी मुळे राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे पुरस्कार जाहीर झाले असून कल्याण परमंडळ 3 मधील कल्याण गुन्हे शाखेत कार्यरत असलेले संजय माळी यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
संजय हे फेब्रुवारी 1990 साली पोलीस शिपाई म्हणून ठाणे शहर पोलीस येथे रुजू झाले. त्यांनी आत्तापर्यंत वागळे इस्टेट, वर्तकनगर, विशेष गुन्हे शाखा ठाणे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उल्हासनगर व कल्याण येथील गुन्हे शाखा विभागात सेवा दिली आहे. पोलीस शिपाई ते पोलीस उप निरीक्षक पदाचा टप्पा त्यांनी पार केला आहे. याच महिन्यात त्यांची पोलीस उप निरीक्षक पदी पदोन्नती झाली. आणि त्या पाठोपाठ त्यांना राष्ट्रपती पदक देखील जाहीर झाल्याने संजय यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
जळगाव येथील भडगावचे मूळ रहिवासी असलेले संजय माळी यांचे वडीलदेखील पोलिस खात्यात अधिकारी पदावर होते. त्यांच्याकडूनच संजय यांना शिस्त मिळाली आहे. शिक्षण घेतल्यावर संजय माळी हे 1990 साली पोलिस खात्यात नोकरीला लागले. आत्तापर्यंत त्यांची 32 वर्षे 8 महिने सेवा झाली आहे.
2019 साली बदलापूर अंबरनाथ परिमंडळात कार्यरत असताना घरफोडी चे प्रमाण वाढले होते. त्याचा तपास करत असताना तांत्रिक माहिती आधारे अनेक मोबाईल नंबर हे यूपी चे असल्याचे निदर्शनास आले होते. सदर आरोपींना यूपी येथे जाऊन अटक करण्यात आली होती.त्यावेळी 42 गुन्हे उघडकीस आले होते. यांसारख्या अनेक गुन्ह्यांची उकल केली असल्याचे संजय सांगतात.
याआधी ही संजय यांना त्यांच्या उत्कृष्ठ कामगिरी मुळे महाराष्ट्र पोलीस महासंचालनालय मुंबई यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे. आत्तापर्यंत 358 बक्षिसे माळी यांनी प्राप्त केली आहेत. राष्ट्रपती पदक मिळाल्याने कामाचे सार्थक झाल्याची भावना माळी यांच्या चेहऱ्यावर उमटत आहे. तर पोलीस दलाकडून देखील त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.