satyajeet tambe on shubhangi patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Satyajeet Tambe : थोरातांच्या भेटीला गेलेल्या शुभांगी पाटलांबद्दल सत्यजीत तांबे म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नाशिकः नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष म्हणून रिंगणात असलेले सत्यजीत तांबे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. वडील सुधीर तांबे यांनी १५ वर्षांमध्ये पदवीधरांची, शिक्षकांची मन जिंकली आहेत; त्यामुळे आपल्याला ही निवडणूक सोपी जाणार असल्याचं तांबे म्हणाले.

सत्यजीत तांबे पुढे म्हणाले की, सुधीर तांबेंनी १५ वर्षात शिक्षकांची मन जिंकण्याचं काम केलं आहे. मीही नाशिक विभागातील पदवीधरांना न्याय देण्याचं काम करेन. आज आम्हाला नाशिक विभागातील एनडीएसटीने पाठिंबा दिला आहे. कनिष्ठ महाविद्यालय महासंघानेही पाठिंबा दिला असल्याचं तांबे म्हणाले.

'सर्व राजकीय प्रश्नांची उत्तरं मी सविस्तरपणे देणार आहे. आज ती वेळ नाही, असं सत्यजीत म्हणाले. मविआच्या उमेदवार शुभांगी पाटील बाळासाहेब थोरातांच्या भेटीसाठी गेल्या होत्या. त्यावर त्यांना प्रश्न विचारला असता. त्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, शुभांगी पाटील ह्या काल बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला गेल्या होत्या. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. विशेष म्हणजे थोरातांच्या गेटवरच त्यांना अडवलं गेलं. त्यांनी बाळासाहेब थोरातांना फोनही फिरवला. परंतु त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही.

दरम्यान, काँग्रेसने सत्यजीत तांबे यांच्याऐवजी वडील सुधीर तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी दिली होती. ऐनवेळी सुधीर तांबे यांनी अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे पक्षाकडून दोघांवरही कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT