Shivsena 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेचे संख्याबळ 56 वरून 64 वर; 'या' आमदाराचाही पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेच्या आमदारांचा संख्याबळ 56 वरून आता 64 पर्यंत वाढलं आहे. कोल्हापूर मधील शिरोळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची रात्री उशिरा मातोश्रीवर भेट घेऊन त्यांनी पाठिंबा देत असल्याचे पत्र उद्धव ठाकरेंना दिले.यावेळी शिवसेना नेते एकनाथ शिंदे उपस्थिती होते.राजेंद्र पाटील यद्रावकरांच्या पाठिंब्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्याबळ आता 64 इतकं झालं आहे.

यापुढील काळात शिवसेनेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार  असल्याचे राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितले.राज्यातील शेतकऱ्यांना, कामगारांना न्याय, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा आणि  बेरोजगार युवकांना रोजगार शिवसेनाच मिळवून देऊ शकते हा विश्वास असल्यानेच आपण शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे राजेंद्र पाटील यद्रावकर यांनी सांगितले.त्याचबरोबर शिरोळ आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना आणि ओला दुष्काळमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे ही  राजेंद्र पाटील यद्रावकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lonavala: दुर्गा श्वानामुळे सापडला ४०० फूट खोल दरीतला मृतदेह; ड्रोन तंत्रज्ञानाचीही झाली मोठी मदत

Paschim Maharashtra Temple Recruitment 2026: पश्चिम महाराष्ट्रातील मंदिरांसाठी लवकरच सुरू होणार नवी पदभरती; बक्कळ पगार अन् मिळणार ही सुविधा

Latest Marathi News Live Update : भाजप जिल्हाध्यक्षकडे २ मतदान ओळखपत्र, शिवसेना नेत्याचा आरोप

कोण्या दिग्गज व्यक्तीने नाही तर 'या' माणसाने दादा कोंडकेंना दाखवली पांडू हवालदार सिनेमातील मोठी चूक

ज्ञानदा रामतीर्थकरने पहिल्यांदा प्रेमाबद्दल घरी सांगताच वडिलांनी दिलेली अशी प्रतिक्रिया; म्हणाली, 'साखरपुड्याच्या दिवशी जाणवलं की...'

SCROLL FOR NEXT