uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

India Alliance Meeting : इंडिया आघाडीची बैठक संपली; उद्धव ठाकरेंनी सांगितली पुढची रणनीती, म्हणाले...

संतोष कानडे

मुंबईः काल सुरु झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीचं आजचं दुसरं सत्र संपलं आहे. या बैठकीमध्ये काही ठराव घेण्यात आले असून पुढील रणनीती निश्चित करण्यात आलेली आहे. सुरुवातीला आदित्य ठाकरे यांनी बैठकीत घेतलेले चार ठराव मांडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकारांसमोर भूमिका विषद केली.

उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, दिवसेंदिवस इंडिया आघाडी मजबूत होत आहे. त्यामुळे विरोधी गटामध्ये घबराहट पसरली आहे. आम्ही देशप्रेमी आहोत, त्यामुळे देशहिताचा नारा आम्ही दिलेला आहे. इथून पुढचा लढा देशाच्या हितासाठी असल्याचं ठाकरेंनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, आजच्या बैठकीमध्ये चांगले निर्णय घेण्यात आलेले आहेत. काही कमिट्या आजच्या बैठकीत गठीत करण्यात आलेल्या आहेत. येणाऱ्या काळात भ्रष्टाचार, हुकूमशाहीविरोधात आम्ही लढणार आहोत. सबका साथ.. सबका विकास, असं ते म्हणाले होते, परंतु ज्यांनी साथ दिली त्यांना लाथ देण्याचं काम भाजपने केलं आहे.

''अर्ध्या ते रात्री घोषणा करत आहेत, हे चालू.. ते बंद. परंतु आता आपल्याला भयमुक्त भारतासाठी काम करायचं आहे. एलपीजी गॅस सिलिंडर २०० रुपयांनी स्वस्त केलं असेल परंतु मागच्या ९ वर्षांमध्ये कितीवेळा गॅसच्या किंमती वाढवल्या, हे बघावं लागेल. गॅस स्वस्त झाला खरा मात्र त्यावर शिजवणार काय? कारण सगळंच महाग करुन ठेवलं आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

बैठकीत झालेले ठराव आदित्य ठाकरेंनी वाचून दाखवले

  • आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प

  • जागा वाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून निवडणुकांना सामोरे जाणार

  • देशाच्या विविध भागांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर रॅली काढण्यात येणार

  • 'जुडेगा भारत, जितेगा भारत' ही थीम विविध भाषांमध्ये मांडली जाणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT