Sharad Pawar News Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Update : ''चुकीच्या रस्त्यावर गेलेल्यांना योग्य रस्त्यावर आणण्याचं काम करु'' शरद पवारांचा रोख कुणाकडे?

संतोष कानडे

Mumbai News : इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक संपलेली आहे. या बैठकीनंतर मल्लिकार्जून खर्गे, राहुल गांधी, लालू प्रसाद यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह शरद पवारांनीही माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी एक सूचक विधान केलं आहे. त्यांच्या रोख नेमका कुणाकडे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

शरद पवार बोलताना म्हणाले की, देशाच्या समोर एक गंभीर समस्या आहे, त्यावर एकत्र येत काम करणं गरजेचं आहे. त्याबाबत दोन दिवस आम्ही चर्चा केली असून देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, बेरोजगारी, महागाईचे विषय असोत, सरकारचं याकडे दुर्लक्ष आहे.

पवार पुढे म्हणाले की, भाजपविषयी लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. सत्ता हातात आल्यावर त्यांनी ज्या पद्धतीने कारभार केला त्याचे गंभीर परिणाम दिसून आले. राजकारणात राजकीय पक्ष एकत्र काम करण्याची भूमिका घेत असतात, त्यामुळे समजूतदारपणा असायला हवा. आज इथे बैठक घ्यायचं ठरवलं त्यांनतर भाजपचे लोक टीका करायला लागले, हे चुकीचं आहे.

शरद पवार पुढे म्हणाले की, इथल्या लोकांना घंमडिया बोलतात... घंमडिया कोणाला बोलतात... एकत्र आले ते पटत नाही त्यांना घंमडिया बोलतात. परंतु आम्ही चुकीच्या रस्त्यावर जाणार नाही. जे चुकीच्या रस्त्यावर गेले त्यांना चांगल्या रस्त्यावर आणण्याचं काम करू. असं म्हणत शरद पवारांनी चर्चेला विषय दिला आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून वेगळी भूमिका घेतली. सत्तापक्षाला समर्थन देऊन अजित पवार सत्तेत गेले आहेत. त्यांच्याकडे रोख देऊन शरद पवार बोलले का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार पुन्हा भूमिका बदलणार का? असाही प्रश्न पवारांच्या विधानामुळे उपस्थित होतोय.

14 नेत्यांची समन्वय समिती गठीत

1.केसी वेणुगोपाल, आयएनसी

2.शरद पवार, राष्ट्रवादी

3.टीआर बाळू, द्रमुक

4.हेमंत सोरेन, JMM

5.संजय राऊत, ठाकरे गट

6.तेजस्वी यादव, राजद

7.अभिषेक बॅनर्जी, टीएमसी

8.राघव चड्ढा, आप

9.जावेद अली खान, एस.पी

10.लल्लन सिंग, जदयू

11.डी. राजा, भाकप

12.ओमर अब्दुल्ला, एन.सी

13.मेहबूबा मुफ्ती, पीडीपी

14.CPI-M (नाव नमूद नाही)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, लहानपणीच पितृछत्र हरपलं, आईने कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT