india alliance  esakal
महाराष्ट्र बातम्या

INDIA Alliance Meeting Mumbai : ''अटकेची तयारी ठेवा'' इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. या बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी सहकाऱ्यांना सावध केलं असून अटकेची तयारी ठेवा, असं म्हटलं आहे.

मुंबईत इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. काल २८ पक्षांचे नेते मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये दाखल झाले होते. आज सकाळी फोटोसेशन आटोपल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आहे.

इंडिया आघाडीतील नेत्यांची बैठक संपन्न झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल. त्यापूर्वी बैठकीत नेते बोलत आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी बैठकीतील उपस्थित नेत्यांना अटकेची तयारी ठेवा, असा सल्ला दिलाय. 'एबीपी माझा'ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

काय म्हणाले मल्लिकार्जून खर्गे?

बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, सध्या भाजप सूडबुद्धीने काम करत आहे. देशातल्या तपास यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत आहे. त्यामुळे आपल्याला अटकेची तयारी ठेवावी लागेल.

विरोधी पक्षातील नेत्यांना दाबण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग होऊ शकतो. तरीही आपण सरकारच्या कार्यपद्धतीवर हल्ला करणं आवश्यक आहे. आपल्या काही सहकाऱ्यांवर छापे पडण्याची शक्यता आहे, असंही खर्गे म्हणाले.

इंडिया आघाडीचं संयोजक पद काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे द्यावं यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. आजच्या पत्रकार परिषदेत याबद्दल स्पष्टता येऊ शकते.

दरम्यान, इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण पुढे ढकलण्यात आल्याची माहिती येत आहे. लोगोचं अनावरण दिल्लीत करण्याच्या सूचना काही नेत्यांकडून आल्या होत्या. यामुळे दिल्लीत पुढील आठवड्यात अनावरण होईल, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugar Price: रक्षाबंधनाच्या तोंडावर साखरेचे दर घसरले! किरकोळ बाजारातही मिळणार फायदा; सरकारच्या नव्या कोटा पद्धतीचा काय परिणाम होणार?

Bolero Bike Accident : टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने बोलेरो पेटवली

Pune Traffic Update: पुण्यातील 'ट्रॅफिक'बाबत मोठी अपडेट! शहरातील 'मिसिंग रोड'च्या कामांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Nepal Floods: नेपाळच्या महापुरात अजून किती भारतीय नागरिक बेपत्ता? MEA कडून मोठं अपडेट समोर; संपूर्ण आकडेवारी सांगितली!

Sonal Dinusha Story: रक्षाबंधन स्पेशल! बहिणीने उधार पैसे घेऊन दिली होती पहिली बॅट; आज त्याच भावाने भारताविरुद्ध गाजवलं नाव

SCROLL FOR NEXT