india alliance  esakal
महाराष्ट्र बातम्या

INDIA Alliance Meeting Mumbai : इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे 4 ठराव; आघाडीच्या एकसंधतेसाठी...

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरु आहे. थोड्याच वेळात आघाडीतील नेत्यांची एकत्रित पत्रकार परिषद होईल. या बैठकीमध्ये समन्वय समितीची स्थापन झाली आहे. तर आता चार महत्त्वाचे ठराव झाल्याचं पुढे येतंय.

हे आहेत चार ठराव...

  • आगामी लोकसभा निवडणुका शक्य तितक्या एकत्र लढण्याचा संकल्प

  • जागा वाटपाबाबत लवकरात लवकर तोडगा काढून निवडणुकांना सामोरे जाणार

  • देशाच्या विविध भागांमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवर रॅली काढण्यात येणार

  • 'जुडेगा भारत, जितेगा भारत' ही थीम विविध भाषांमध्ये मांडली जाणार

आघाडी एकसंध राहण्यासाठी हे चार ठराव इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये मांडण्यात आलेले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेतून अधिकृत माहिती देण्यात येणार आहे. सध्या आघाडीची बैठक मुंबईतल्या हयात हॉटेलमध्ये सुरु आहे.

दरम्यान, मुंबईतल्या बैठकीमध्ये इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होणार होतं. परंतु ते दिल्लीतून करण्यासंबंधी बैठकीमध्ये चर्चा झाली. त्यानुसार पुढच्या आठवड्यात दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या लोगोचं अनावरण होईल, अशी माहिती मिळतेय.

दरम्यान, बैठकीमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी, अटक होण्याची तयारी ठेवा असं विधान केल्याचं समोर आलेलं आहे. 'एबीपी माझा'ने दिलेल्या वृत्तानुसार खर्गे म्हणाले की, भाजप तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे. येत्या काळात आपल्यावर छापे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अटकेची तयारी ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case: खरात प्रकरणात मोठी अपडेट! ईडीकडून ११ ठिकाणी छापे; आजच्या सुनावणीत काय घडलं?

Gas Cylinder Shortage : मोठा काळाबाजार! चाकणला कमर्शियल वापराचा गॅस सहा हजार रुपयाला

पुलाचा एक मार्ग सुरू करण्याची घाई ११ जणांच्या जीवावर, प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे बळी; मुरबाडवर शोककळा

Jalgaon Temperature : जळगावसह जिल्ह्याचा पारा पोहोचला ४१ अंशांवर; रस्‍त्‍यांवर दुपारी शुकशुकाट

Legendary Singer Asha Bhosale : आशाताईंनी अर्धवट सोडला होता 'शो', भावासाठी ओढवून घेतलं होतं 'धर्मसंकट'; IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटलांनी जागवल्या आठवणी!

SCROLL FOR NEXT