India Alliance Esakal
महाराष्ट्र बातम्या

India Alliance : दबावामुळे कोणताही पक्ष 'इंडिया'तून बाहेर पडणार नाही; ठाकरे गटाच्या नेत्याच विधान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - मुंबईत विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. इंडिया आघाडीत २६ राजकीय पक्ष सामील आहे. त्यामुळे विरोधकांची आघाडी बळकट होताना दिसत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकीय पक्षांवर असलेल्या दबावावर भाष्य केलं.

खासदार संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीच्या 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजीच्या बैठकीच्या तयारीला वेग आलेला आहे. देशातील देशभक्त पक्ष एकत्र आले आहेत. भाजपकडून विरोधकांवर कारवाई सुरू आहे. विरोधकांचा निवडणुकीत पराभव करता येणार नाही, म्हणून राजकीय विरोधकांवर खोटे खटले टाकायचे आणि त्यांच्यावर कार्यवाही करायची, असे सत्र सध्या भाजपच्या लोकांनी आरंभलेल आहे. मात्र कुठलाही पक्ष इंडिया आघाडीतून दबावामुळे बाहेर पडणार नाही, असा विश्वासही राऊत यांनी केला.

भाजपाच्या इशाऱ्यावरून महाराष्ट्राचे पोलीस ज्या पद्धतीने कार्यवाही करत आहेत, त्यांनी पहिलं कायद्याचं वाचन करावं. 2024 मध्ये केंद्रात आणि राज्यात आमचे सरकार येत आहे. हे या सगळ्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

फोन टॅपिंग प्रकरण बंद करण्यावर राऊत म्हणाले की, प्रकरण का बंद केलं, या प्रकरणाचे पुरावे असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी का होऊ दिली नाही? याशिवाय आयएनएस विक्रांत घोटाळ्याची चौकशी का थांबवली? सुषमा अंधारेंनी एक प्रकरण बाहेर काढलं, त्याची चौकशी का होत नाही?, असा सवाल करताना राऊत यांनी आज आम्ही जात्यात आहोत, तुम्ही सुपात आहात, 2024 नंतर हे सगळं उलट होईल, असा दावा केला.

यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, राऊत म्हणाले बावनकुळे कोण आहेत? मला माहित नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Heavy Rain Alert : मॉन्सून पुन्हा सक्रिय होणार ! महाराष्ट्रासह १७ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Tamil Nadu Politics: तमिळनाडूत मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा; अण्णा द्रमुकचे १० आमदार ‘टीव्हीके’च्या संपर्कात, १५ ऑगस्टपूर्वी पक्षांतराची शक्यता

Latest Marathi News Live Update : थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भीषण दुर्घटना; पबला लागलेल्या आगीत 27 जणांचा होरपळून मृत्यू, अनेकजण जखमी

Police Constable Death : चंदगड पोलिस ठाण्यात खळबळ! ड्युटी संपवून घरी परतलेल्या 32 वर्षीय तरुण पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू; 3 वर्षांची चिमुरडी पोरकी

Akola: बोगस बियाणे प्रकरणी कंपन्यांना दणका; दोन कंपन्यांवर गुन्हे दाखल; कृषी विभागाची कारवाई

SCROLL FOR NEXT