India Alliance 
महाराष्ट्र बातम्या

India Alliance: इंडिया आघाडीने नागपूरमध्ये होणारी सभा पुढे ढकलली; कारण आलं समोर

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात पाच राज्यातील विधानसभा निवडणुका यावर्षी पार पडत आहेत. तसेच लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी पार पडणार असून त्यासाठी इंडिया आघाडी आणि भाजप जोरदार तयारी करत आहे. याचाच एक भाग म्हणून इंडिया आघाडीने नागपूरमध्ये ५ नोव्हेंबर रोजी भव्य सभेचे आयोजन केले होते. याबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. (India Alliance postponed rally in Nagpur)

इंडिया आघाडीने ५ नोव्हेंबरला नागपूरमध्ये भव्य सभेचे आयोजन केले होते. पण, राज्यात 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान असल्याने तारीख पुढं ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे लोकसभेचे रणशिंग फुंकण्यासाठी इंडिया आघाडीकडून नागपूरला पसंती देण्यात आली आहे.

राज्यात 5 नोव्हेंबरला ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान आहे. त्यामुळे सभा पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती काँग्रेसचे राज्यातील नेत्यांनी वरिष्ठांना केली होती. त्यानंतर सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सभा नंतर कधी घेण्यात येईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. यासंदर्भात निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

देशात लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. २०२४ मध्ये एप्रिल महिन्याच्या दरम्यान निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरु आहे. भाजपला हरवण्यासाठी जवळपास २८ पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे भाजपसमोर आव्हान निर्माण झालं आहे. इंडिया आघाडीने देशभरात संभांचे आयोजन केले आहे. त्याची सुरुवात नागपूरमधून होईल असं सांगण्यात येतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT