Narendra modi and India  
महाराष्ट्र बातम्या

INDIA alliance : इंडिया आघाडीचं ठरलं! लोकसभेला 400 जागांवर एकास एक लढत देण्याची रणनिती?

रवींद्र देशमुख

मुंबई - मुंबईत आज विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची तिसरी दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दांवर चर्चा झाली. तसेच अनेक समित्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासह ओबीसी जनगणनेबाबत सुतोवाच करण्यात आले.

'इंडिया' आघाडीच्या बैठकीत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी ओबीसी जनगणना व्हायला हवी, याबाबत इच्छा व्यक्त केली. याबाबत २ ऑक्टोबरला चौथी बैठक दिल्लीला होण्याची शक्यता आहे. यावेळी एकाच व्यक्तीला संयोजक न करता संयुक्त लढाई लढण्याच्या प्रस्तावाबाबतही निर्णय दिल्लीला होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान केरळ आणि पश्चिम बंगाल वगळता समन्वय समिती नेमण्यात अडचण नसल्याचं समजतं. शिवाय ईव्हीएमविरोधात ओरड करणे अयोग्य असल्याची चर्चाही बैठकीत झाली. तसेच ४०० लोकसभा मतदार संघात एकास एक लढत देण्याची रणनिती इंडिया आघाडीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

या व्यतिरिक्त जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर सुरू करण्यात येणार असून जिंकण्यासाठी त्याग करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. मात्र त्याचवेळी लोगोवर एकमत झालं नसल्याचं समोर आलं आहे. आता तयार केलेल्या लोगोमध्ये काँग्रेसचा हात आणि भारत जोडोचा प्रभाव जाणवत असल्याचा आक्षेप कम्युनिस्ट पार्टीने घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump ultimatum : ट्रम्प यांचा हमासला ४८ तासांचा अल्टिमेटम! ; म्हणाले, ‘’आता जर ऐकलं नाहीतर...’’

Pune Crime : कुख्यात गुंड नीलेश घायवळचा पासपोर्ट रद्द करणार - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

Mehbooba Mufti Statement : ‘’लडाख, POKमध्ये Gen-Z… ’’ ; मेहबूबा मुफ्तींनी केलं मोठं विधान!

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या अडचणी वाढणार? ; पुणे पोलिसांनी बजावली नोटीस!

IND vs AUS: विराट कोहली आणि रोहित शर्माचे पुनरागमन होणार? ऑस्ट्रेलियाविरुद्ध ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा कधी? तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT