Narendra Modi and Balasaheb Thorat  
महाराष्ट्र बातम्या

INDIA vs Modi : 'इंडिया'बाबत अशी शेरेबाजी पंतप्रधानपदाला न शोभणारी; थोरातांची मोदींवर टीका

रवींद्र देशमुख

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षांनी स्थापन केलेल्या 'इंडिया' आघाडीवर जोरदार टीका केली आहे. 'इंडिया' हे नाव इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनी, इंडियन मुजाहिद्दीन संघटनेच्या नावात देखील आहे. केवळ इंडिया नाव ठेवल्याने काही होत नाही, असं मोदी म्हणाले होते. यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार टीका केली आहे.

थोरात म्हणाले, पंतप्रधानांनी अशी टीका करणे योग्य नाही. पंतप्रधानपद हे मोठं पद आहे. पंतप्रधान देशाचे प्रमुख असतात. असे असताना विरोधकांनी एकत्र येऊन इंडिया संघटना स्थापन केली. त्यावर अशा प्रकारे शेरेबाजी करणे योग्य नाही.

यावेळी थोरात यांनी विरोधीपक्ष लवकरच निश्चित करण्यात येईल, असंही सांगितलं. - पोलिसांविषयी देखील अत्यंत चुकीच्या पद्धतीने हे सरकार निर्णय घेत आहे. आमचा त्याला विरोध असल्याचं थोरात यांनी नमूद केलं.

भाजपला आगामी लोकसभेत पराभूत करण्यासाठी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. विरोधकांनी आपल्या आघाडीला 'इंडिया' (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार ) (sharad pawar), आणी शिवसेना (ठाकरे) (uddhav thakre) हे तीन मुख्य विरोधी पक्ष सुद्धा या गटामध्ये सामील झाले आहेत. यावर मोदींनी आज कडाडून टीका केली. त्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT