ODI World Cup Esakal
महाराष्ट्र बातम्या

ODI World Cup 2023 : वर्ल्डकपच्या मैदानात राजकारण रंगणार? भारत vs पाकिस्तान सामन्यावर CM शिंदे घेणार का मोठा निर्णय

भारत vs पाकिस्तान सामना शिवसेनेला मान्य? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष

अंकिता खाणे (Ankita Khane)

यावर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये वन डे क्रिकेट वर्ल्डकप होणार आहे, याच यजमानपद भारताकडं आहे. 15 ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान सामना हा गुजरातमधील अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. या मुद्द्यावरून राजकारण रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Marathi Tajya Batmya)

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सत्तेत आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सामन्याबाबत काय भूमिका घेणार, हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे. याच कारण म्हणजे पाकिस्तानी संघाने भारतामध्ये खेळण्यास बाळासाहेब ठाकरे यांचा विरोध होता.(Latest Marathi News)

तर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे बीसीसीआयचे सचिव जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सुपुत्र आहेत, तर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे खजिनदार आहे. या संबधामुळे सामन्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहीलं आहे.(Latest Marathi News)

टीम इंडियाचं विश्वचषकातील संपूर्ण शेड्यूल

8 ऑक्टोबर भारत vs ऑस्ट्रेलिया, चेन्नई

11 ऑक्टोबर भारत vs अफगाणिस्तान, दिल्ली

15 ऑक्टोबर भारत vs पाकिस्तान, अहमदाबाद

19 ऑक्टोबर भारत vs बांग्लादेश, पुणे

22 ऑक्टोबर भारत vs न्यूझीलंड, धर्मशाला

29 ऑक्टोबर भारत vs इंग्लंड, लखनऊ

2 नोव्हेंबर भारत vs क्वालिफायर, मुंबई

5 नोव्हेंबर भारत vs साऊथ आफ्रिका, कोलकाता

11 नोव्हेंबर भारत vs क्वालिफायर, बंगळुरू

राज्यात CM शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त फेमस

आज, १३ जून रोजी राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रात राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशा टॅगलाइन खाली पानभर जाहिरात देण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान आता या जाहिरातीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.(Latest Marathi News)

या जाहिरातील महाराष्ट्राती २६.१ टक्के जनतेला एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र हवेत तर देवेंद्र फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांची पसंती असल्याचे एका सर्व्हे मध्ये समोर आल्याचे या शिवसेनेच्या जाहिरातीमध्य म्हटले आहे. या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंपेक्षा तब्बल तीन टक्के मते कमी मिळाल्याचे सांगण्यात आलं आहे.(Marathi Tajya Batmya)

इतकेच नाही तर महाराष्ट्रातील जनतेने ४९.३ टक्के जनतेने पुन्हा या जोडीला पसंती दर्शवल्याचे देखील या जाहीरातीमध्ये म्हटले आहे. दरम्यान फडणवीस आणि शिंदे यांची या जाहिरातीमध्ये एकंदरीत तुलना करण्यात आली आहे. दरम्यान या जाहिरातीवरून आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT