Sushma Andhare and Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare : ...तर मग तुम्ही गुवाहाटीला चारधाम करायला गेला होतात का? अंधारेंचा शिंदे गटाला सवाल

रवींद्र देशमुख

मुंबई - विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीची बैठक गुरुवार आणि शुक्रवारी अर्थात काल आणि आज आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत देशभरातील विविध पक्षांचे नेते सामील झाले होते. या बैठकीवर सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. यावरून उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला.

सुषमा अंधारे यांनी मंत्री दीपक केसरकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करताना म्हटलं की, वंदनीय बाळासाहेबांना लाचारी मान्य नव्हती. केसरकर तुम्ही नेमके कोणते खरे? सोयीनुसार, भारत आणि सोयीनुसार हिंदुस्थान म्हणता. तुम्ही म्हणाले, इंडिया आघाडी म्हणजे, भ्रष्टाचारी नेत्यांचा मेळावा आहे. हे भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्यासाठी सुरू असल्याचं म्हणता. याबाबत तुम्ही तुमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला विचारा.

दोन दिवसांपूर्वी मोदीजींनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, तीच माणसं, दोन दिवसांनी तुमच्यासोबत आली. तुमच्याकडे माणसं आली की, भ्रष्टाचार संपतात का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या की, इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो. मग तुम्ही गुवाहाटीला, चारधाम करण्यासाठी किंवा पुण्य कमावयला गेला होतात का, असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT