Soldier Somnath Mandhare esakal
महाराष्ट्र बातम्या

साताऱ्याच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

भद्रेश भाटे, पुरुषोत्तम ढेरे

वाई (सातारा) : वाई तालुक्यातील (Wai Taluka) आसले गावचे सुपुत्र सोमनाथ मांढरे (Soldier Somnath Mandhare) यांना लडाख (Ladakh) येथे देशसेवा करीत असताना अतिशय प्रतिकूल वातावरणाचा सामना करताना वीरमरण आले. लडाख येथे काल पहाटेपासून त्यांची नेमणूक होती. यावेळी हवामानातील बदलामुळे त्यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यातच ते बेशुद्ध झाले.

जवान मांढरे यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

जवान मांढरे यांना जवळच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याची माहिती सायंकाळी (ता. 18) कुटुंबीयांना कळविण्यात आली. वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना ही माहिती मिळाली. त्यांनी आसले (ता. वाई) येथील त्यांचे बंधू महेश मांढरे यांना याबाबतची माहिती कळवली.

सोमनाथ मांढरे यांना वीरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, आठ वर्षांचा मुलगा, अवघ्या दहा महिन्यांची मुलगी व लहान भाऊ असा परिवार आहे. हुतात्मा जवान सोमनाथ मांढरे यांचे पार्थिव आज (ता. 19) पहाटे दिल्लीत पोहोचेल. तद्नंतर सायंकाळपर्यंत आसले या मूळ गावी पोहोचेल व त्यांच्यावर शासकीय इतमामात आसलेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT