मुंबई - माझगाव गोदी येथे ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकेचे शनिवारी जलावतरण करण्यात आले.
मुंबई - माझगाव गोदी येथे ‘आयएनएस निलगिरी’ या युद्धनौकेचे शनिवारी जलावतरण करण्यात आले. 
महाराष्ट्र

...तर नौदलाकडून सडेतोड उत्तर! - राजनाथसिंह

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईवर ‘२६/११’ सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचला जात असून, तो यशस्वी होऊ देणार नाही. कोणीही देशातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, तर नौदलाकडून त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी दिला. संपूर्ण भारतीय बनावटीची अद्ययावत ‘आयएनएस खांदेरी’ ही पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. त्या वेळी संरक्षणमंत्री बोलत होते. या वेळी नौदलाचे प्रमुख करमबिर सिंग उपस्थित होते.

आयएनएस खांदेरी पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वी पार पडल्या आहेत. कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल आणि विद्युत (इलेक्‍ट्रिक) प्रकारातील सर्वांत प्रगत तंत्रज्ञानाचा यात वापर करण्यात आला आहे. या वेळी बोलताना संरक्षणमंत्री म्हणाले, की आयएनएस खांदेरीमुळे भारतीय नौदलाची क्षमता अनेक पटींनी वाढली आहे, हे पाकिस्तानने आता लक्षात ठेवावे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरूनच या पाणबुडीचे नाव खांदेरी ठेवण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी नौदलाचे सामर्थ्य ओळखले होते. त्यांचे जे स्वप्न होते, ते पूर्ण करण्याची क्षमता भारतीय नौदलात आहे, असे गौरवोद्‌गारही सिंह यांनी या वेळी काढले. 

माझगाव गोदी येथे ‘प्रोजेक्‍ट १७ ए’ अंतर्गत बांधणी सुरू असलेल्या ‘आयएनएस निलगिरी’ या पहिल्या युद्धनौकेचे जलावतरण राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील नौदल गोदीत नौदलाच्या विमानवाहू नौका दुरुस्त करण्यासाठी समुद्रातील सर्वांत मोठा ड्राय डॉक (दुरुस्ती तळ) उभारण्यात आला आहे. हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीने हा तळ उभारला असून संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT