Raigaed Esakak
महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्याची रायगडावर जय्यत तयारी

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : खासदार युवराज संभाजीराजे (Sambhaji Raje)छत्रपती यांच्या निमंत्रणानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) (ता.६) डिसेंबरला दुर्गराज रायगडला (Raigad)भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणार आहेत. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिल्ली येथे आयोजित शिवजयंती सोहळ्यात गडावर येण्यासाठी कोविंद यांना निमंत्रण दिले होते. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी रायगड जिल्हा प्रशासन व रायगड विकास प्राधिकरणातर्फे जोरात सुरु आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली आहे.

दरम्यान, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग रायगडावर १९८५ ला होते. त्यानंतर ३५ वर्षांनंतर राष्ट्रपती गडाला भेट देणार आहेत. यामुळे शिवप्रेमींच्यामध्ये मोठा उत्साह आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी १९८० ला रायगडावर आल्या होत्या. त्यांनी सिंहासनाच्या जागेवर मेघडंबरी उभारण्याची सूचना केली होती. मेघडंबरीचे काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचे अनावरण झाले. या घटनेला पस्तीस वर्षे झाली आहेत.

रायगड तयारी

संभाजीराजे यांनी सोशल मिडियावर तयारीचे फोटो शेअर केले आहेत. ते म्हणतात,आदरणीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या किल्ले रायगड वरती येत आहेत. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रायगड विकास प्राधिकरण, भारतीय पुरातत्त्व खाते, व अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले आहे. युवराज संभाजी छत्रपती महाराज, व युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांच्या सुचनेप्रमाणे गडावर सुरक्षतेसाठी व नियोजनासाठी आलेल्या प्रत्येकाला पोटभर जेवण मिळावे यासाठी गेल्या दोन दिवसापासून अन्नछत्र सुरु करण्यात आले आहे. असे म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT