Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sakal
महाराष्ट्र

अनेक सरकारी वेबसाईट्स हॅक; गृहमंत्री वळसे पाटलांनी केलं कन्फर्म

सकाळ डिजिटल टीम

नुपूर शर्मा प्रकरणात सध्या देशातल्या अनेक खासगी आणि सरकारी वेबसाईट्स हॅक झाल्याची घटना समोर आली आहे. त्यातच आता ठाणे पोलिसांची वेबसाईटही हॅक करण्यात आली आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर हल्ल्याची आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही पुष्टी केली आहे. (Thane Police website hack confirmed by Home Minister Dilip Walse Patil)

पत्रकार परिषदेत बोलताना दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी याविषयीची माहिती दिली आहे. वळसे पाटील म्हणाले की, गेल्या २ दिवसात देशात अनेक वेबसाईट हॅक झाल्यात. आपले सायबर प्रमुख याबाबद्दल तपासणी करत आहेत. ठाणे पोलिसांची वेबसाईट देखील हॅक झालीये. राज्य सरकारने याचा आढावा घेतलाय. यावर काय उपाययोजना करायच्या यावर यंत्रणा काम करत आहेत.

निलंबित भाजपा नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma Prophet Mohammad Row) यांच्या वादग्रस्त विधानाचे पडसाद देशभरात उमटत आहेत. देशभरातल्या ७० हून अधिक वेबसाईट्स हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातल्या हॅक्टिविस्ट गृप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर हा हल्ला करण्यात आला होता. वेबसाईट हॅक करुन मुस्लीम धर्मियांची माफी मागावी अशी मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT