Indian Railway New Decision esakal
महाराष्ट्र बातम्या

Indian Railway New Decision : आता घरबसल्या करता येईल ही गोष्ट, रेल्वेकडून मोठा बदल

भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंगसाठी नवीन बदल केले आहेत

सकाळ डिजिटल टीम

Indian Railway New Decision : भारतीय रेल्वेनं तिकीट बुकिंगसाठी नवीन बदल केले आहेत; आणि हे बदल आता अनेक प्रवशांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नेहमीच काहीना बदल करत असते. असाच एक बदल प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे मंत्रालयानं केलाय. अनारक्षित म्हणजेच जनरलच्या तिकिटांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

जनरल तिकीट बुकिंगबाबत भारतीय रेल्वेनं केलेले बदल

जनरल तिकीट बुकिंग करून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हा फायदेशीर बदल केला आहे. खरंतर मंत्रालयानं अॅपवरून अशाप्रकारे तिकीट बुक करण्यासाठी अंतर वाढवलं ​​आहे. रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार रेल्वे विभागानं मर्यादित अंतराच्या तिकिटांचा गैरवापर थांबवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

ॲपच्या आधी आपल्याला स्टेशन वर जाऊनच येणाऱ्या गाडीच बुकिंग करावं लागत होत; पण ॲप आल्यापासून आपण ऑनलाइन बुकिंग करू शकतो; पण यासाठी त्या रेल्वे स्टेशन पासून फार फार तर 2 किमी अंतरापर्यंत बुकिंग करू शकत होते. पण आता दोन किमीचे अंतर 20 किमी करण्यात आलं आहे.

‘या’ ट्रेनसाठी बदलला नियम-

भारतीय रेल्वेच्या नवीन प्रणालीनुसार, उपनगरी नसलेल्या वर्गांसाठी, पाच किलोमीटरऐवजी, 20 किलोमीटर अंतरावरूनही जनरलच तिकीट बुक करता येणार आहे आणि उपनगरीय विभागासाठी तिकीट बुक करण्यासाठी हे अंतर दोन किमीवरून पाच किमी करण्यात आले आहे. ही सुविधा सुरू झाल्यानंतर आता प्रवाशांची स्टेशनवर पोहोचल्यानंतर तिकिटासाठी लागणाऱ्या लांबच लांब रांगांपासून सुटका होणार आहे. कारण आता तुम्ही घरी बसून जनरल तिकीट बुक करू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कॅब लवकर हवी? आता आधीच टिप देण्याचा खेळ संपला! सरकारचा Uber-Ola ला मोठा आदेश

Gelatin Blast: पुण्यातल्या कामगाराचं भयंकर कृत्य! कमरेला स्फोटकं बांधून सासरवाडीत पोहोचला, एक बटण दाबलं अन् सगळं संपलं

Onion Rate : मंचर बाजार समितीत कांद्याला दहा किलोस मिळाला ४११ रुपये उच्चांकी बाजार भाव

Sangli Accident: रेणावी घाटात काळाचा घाला! दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, तीन जणांचा मृत्यू, काही जखमी

Pune News : प्रशासनातील वाद चव्हाट्यावर! वरिष्ठ अधिकारी दुजाभाव करतात; महापालिका आयुक्तांकडे तक्रार

SCROLL FOR NEXT