Indian Railway Sakal
महाराष्ट्र बातम्या

Indian Railways: राज्यातील 'या' स्टेशनवर प्रवाशांना मिळणार 20 रुपयांत जेवण, रेल्वेने सुरू केली खास सुविधा

Indian Railways IRCTC Meal: प्रवाशांना किफायतशीर दरात दर्जेदार जेवण मिळावे यासाठी रेल्वेने ही सुविधा सुरू केली आहे.

राहुल शेळके

Indian Railways IRCTC Meal: भारतीय रेल्वेने दररोज मोठ्या संख्येने लोक प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये याची रेल्वे विशेष काळजी घेते. औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना स्वस्त दरात खाद्यपदार्थांची पाकिटे देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

सामान्य बोगीतील प्रवाशांना किफायतशीर दरात दर्जेदार जेवण मिळावे यासाठी औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनवर आल्यावर प्रवाशांना जेवणासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी आयआरसीटीसीच्या मदतीने सर्वसामान्य बोगीजवळ स्टॉल लावून खाद्यपदार्थांची पाकिटे विकली जाणार आहेत.

रेल्वे प्रवाशांना दर्जेदार, किफायतशीर आणि आरोग्यदायी जेवण मिळावे यासाठी भारतीय रेल्वेने इकॉनॉमी मील ही संकल्पना सुरू केली आहे. याअंतर्गत रेल्वे प्रवाशांना, विशेषत: सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्यांना परवडणाऱ्या किंमतीत जेवण दिले जाणार आहे.

पुरी-भाजी आणि लोणचे 20 रुपये

या काउंटरवर मिळणारे खाद्यपदार्थ दोन प्रकारात विभागले गेले आहेत. पहिल्या प्रकारात सुक्या बटाट्यासह पुरी-भाजी आणि लोणचे 20 रुपयांना दिले जातील. तर दुसऱ्या प्रकारात जेवणाची किंमत 50 रुपये असेल आणि प्रवाशांना भात, राजमा, छोले, खिचडी, कुलचे, भटुरा, पावभाजी आणि मसाला डोसा असे पदार्थ खायला मिळतील.

याशिवाय प्रवाशांसाठी 200 मिमी पॅकेज केलेले सीलबंद ग्लासेस उपलब्ध असतील, ज्याची किंमत 3 रुपये ठेवण्यात आली आहे. रेल्वेच्या या सेवेचा सामान्य डब्यातून प्रवास करणाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्या ठिकाणी जनरल डबा थांबेल त्या ठिकाणी स्वस्त खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले जातील.

ही योजना सुरू करण्यासाठी भारतीय रेल्वेने 64 रेल्वे स्टेशनची निवड केली आहे. आधी काही रेल्वे स्टेशनवर सहा महिन्यांसाठी ही सुविधा सुरू केली आहे. नंतर उर्वरित रेल्वे स्थानकांवर ते सुरू केले जाईल.

पूर्व विभागातील 29 स्टेशन, उत्तर विभागातील 10 स्टेशन, दक्षिण मध्य विभागातील 3 स्टेशन, दक्षिण विभागातील 9 स्टेशनचा समावेश करण्यात आला आहे, जिथे स्वस्त जेवण मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT