Corona-Danger 
महाराष्ट्र बातम्या

Coronavirus : भारतीयांनो, ‘लाइटली’ घेऊ नका - जीवन कर्पे

सकाळवृत्तसेवा

पुणे - जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, तेव्हा युरोपातील देश गाफील राहिले. त्यांना वाटले, की ही महामारी फक्त चीनपुरतीच मर्यादित राहील; पण तसे झाले नाही. दुसऱ्या टप्प्यात असतानाही इटली, जर्मनी आदी युरोपियन देशांत शाळा, महाविद्यालये चालू राहिली. लोक रस्त्यांवर फिरत राहिले. पर्यायाने कमी लोकसंख्या असलेल्या युरोपातील पाच हजार लोकांना प्राण गमवावा लागला, आपली तर लोकसंख्या १३० कोटी आहे. तेव्हा भारतीयांनो, युरोपने जी चूक केली ती तुम्ही करू नका, असे कळकळीचे आवाहन जर्मनीत असलेले जीवन कर्पे यांनी देशवासीयांना केले आहे.

कोरोनाचा जर्मनीतील जनजीवनावर झालेल्या परिणामाचा आढावा घेताना कर्पे यांनी ‘सकाळ’ला ही माहिती दिली. 

ते म्हणाले, ‘‘कोरोनाबाबतच्या सूचना ‘लाइटली’ घेऊ नका. जर्मनीतील कमी लोकसंख्या, घरांमधील अंतर आणि सार्वजनिक स्वच्छता यामुळे कोरोनाचा प्रसार होणार नाही. अशा फाजील विश्वासात येथील नागरिक आणि सरकार होते. आता जर्मनी तिसऱ्या टप्प्यात आहे. यामध्ये बाधित व्यक्तींकडून मोठ्या समूहाला बाधा झाली आहे. आता कुठे युरोपीय देशातील सरकारे मोठ्या प्रमाणावर जागृत झाली असून, त्यांनी पूर्णतः बंद पाळला आहे. असे जरी असले तरी बाधितांची संख्या आणि मृतांचा आकडा वाढतच आहे.’

भारतात अजूनही नागरिक बेफिकीरपणे रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. ते धोकादायक आहे. सुमारे आठ कोटी लोकसंख्या असलेल्या जर्मनीत १४ हजार बाधित सापडतात, तर भारताची लोकसंख्या १३० कोटी आहे. या गांभीर्याचा विचार करत लोकांनी प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करायला हवे.
- जीवन कर्पे, जर्मनीतील भारतीय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

SCROLL FOR NEXT