1Corona_203_20fb_10.jpg 
महाराष्ट्र बातम्या

कोरोनामुक्‍त रुग्णांना पुन्हा धोका कमीच ! दुसऱ्यांदा कोरोना झालेले राज्यात अवघे 41 रुग्ण

तात्या लांडगे

 सोलापूर : राज्यात आतापर्यंत 15 लाख 37 हजार व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 80 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्णांना कोरोना झाला, परंतु त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. आतापर्यंत राज्यातील पावणेतेरा लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, एकदा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात ऍन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्यामुळे त्यांना पुन्हा कोरोनाचा धोका कमीच असून आतापर्यंत राज्यातील 41 रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळली आहेत.

राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, नगर, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढतच आहेत. मात्र, ऑगस्ट- सप्टेंबरच्या तुलनेत आता रुग्णवाढीचा आलेख कमी झाला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे 40 हजार 400 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात को-मॉर्बिड तथा ज्येष्ठ नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, एकदा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना 90 दिवसांनंतर कोरोनाचा धोका आहेच. तत्पूर्वी, त्यांना पुन्हा कोरोनाची लागण होऊ शकते. परंतु, त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्‍ती वाढलेली असल्याने आणि त्यांच्या शरीरात ऍन्टीबॉडी तयार झाल्याने त्यांना कोरोनाचा धोका कमी असतो. त्या काळात त्यांनी नियमांचे तंतोतंत पालन करणे अपेक्षित आहे, अशी माहिती राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.


दुसऱ्यांदा कोरोना झालेल्यांची संख्या खूपच कमी
राज्यात आतापर्यंत 12 लाख 70 हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यात दुसऱ्यांदा कोरोना झालेल्यांची संख्या नगण्य आहे. राज्यातील खूपच कमी रुग्णांमध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. मात्र, एकदा कोरोनातून बरे झालेल्यांनी नियमांचे पालन केल्यास त्यांना कोरोनाचा धोका होत नाही. 
- प्रदिप आवटे, राज्य साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी

ठळक बाबी... 

  • कोरोनामुक्‍त रुग्णांमधील रोगप्रतिकारक क्षमतेमुळे त्यांना पुन्हा कोरोनाचा धोका कमीच 
  • राज्यातील एकूण रुग्णांपैकी अवघ्या 41 रुग्णांमध्ये पुन्हा आढळली कोरोनाची लक्षणे 
  • कोरोनामुक्‍त व्यक्‍तींमध्ये ऍन्टीबॉडी तयार होतात; त्यामुळे त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची भिती नाही 
  • सोशल डिस्टन्सिंगसह मास्क व अन्य नियमांचे तंतोतंत पालन करा अन्‌ कोरोनापासून दूर राहा 
  • राज्यातील एकूण रुग्णांमध्ये 80 टक्‍क्‍यांपर्यंत रुग्णांमध्ये नाहीत कोरोनाची लक्षणे तरीही पॉझिटिव्ह 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT