Indrani Mukherjee 
महाराष्ट्र बातम्या

इंद्राणी मुखर्जीला तिसऱ्यांदा जामीन नामंजूर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शीना बोरा हत्या खटल्यातील प्रमुख आरोपी इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अर्ज शुक्रवारी विशेष "सीबीआय' न्यायालयाने नामंजूर केला. प्रकृतीच्या कारणावरून तिने जामीन मागितला होता. 

काही महिन्यांपासून वेगवेगळ्या आजारांनी ग्रासलेल्या इंद्राणीला तातडीने रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे. त्यासाठी तिला जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली होती. भायखळा तुरुंगात तिच्यावर उपचार होऊ शकणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. राज्य सरकारने तिला जामीन देण्यास विरोध केला होता. 

इंद्राणीने आतापर्यंत तीन वेळा जामिनासाठी अर्ज केले आहेत. या खटल्याची नियमित सुनावणी सुरू असून, आतापर्यंत 36 साक्षीदारांची जबानी नोंदवण्यात आली. इंद्राणीने मुलगी शीना बोरा हिची एप्रिल 2012 मध्ये हत्या केली, असा आरोप आहे. या गुन्ह्यात तिचा दुसरा पती आणि वाहनचालक यांनी मदत केल्याचाही आरोप असून, हे दोघेही अटकेत आहेत. हा गुन्हा ऑगस्ट 2015 मध्ये उघड झाला होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Tariffs Policy : इराण युद्धादरम्यान ट्रम्प यांची नवी चाल, औषधांवर लावला १०० % टॅरिफ, न्यायालयाने फटकारल्यानंतरही धोरण कायम

Gadchiroli News : भुकेल्या माओवाद्यांना पोलिस जवानांनी भरवला घास! कांकेरच्या जंगलात बंदुक हरली माणुसकी जिंकली

Abhishek Sharma ची खेळी गाजली, पण वादही पेटला! नेमकं काय घडलं की IPL ने ठोठावला मोठा दंड,KKR सामन्यानंतरचा मोठा ट्विस्ट

Latest Marathi News Live Update : 'INS तारागिरी'आज भारतीय नौदलात दाखल होणार

IPL 2026: धोनी नसताना चेन्नईची कसोटी; पंजाबविरुद्ध आज सर्वच क्षेत्रांत प्रगती करण्याची गरज, कशी असेल संभावित Playing XI

SCROLL FOR NEXT