inflatable rubber boat 
महाराष्ट्र बातम्या

प्रत्येक जिल्ह्यात ‘इन्फेटेबल रबर’ बोटी; अनेकांनी जीव गमावल्यानंतर सरकारला जाग

ज्ञानेश सावंत

मुंबई - पुराच्या तडाख्यात अनेकांचा जीव गेल्यानंतर डोळे उघडलेल्या राज्य सरकारने राज्यभरात आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सुरक्षित आणि पुरेशा क्षमतेच्या ‘इन्फेटेबल रबर’ बोटी उपलब्ध होणार आहेत. विशेष बाब म्हणजे, पावसाळ्याआधी मे महिन्यात या बोटी पुरविण्यात येतील.

या उपायामुळे पूरस्थितीत जीवितहानी टाळणे शक्‍य होण्याची आशा आहे. दुसरीकडे, त्या-त्या शहरांमधील आपत्ती निवारणच्या यंत्रणेचा आढावा घेऊन, आवश्‍यक ते बदल करण्याचा आदेशही स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आला आहे. अतिवृष्टी होऊन पावसाळ्यात राज्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाली; तर कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांत महापूर येऊन मोठी वित्तहानी झाली. महापुरात अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणारी बोट उलटून सांगलीतील ब्रह्मनाळ येथे १७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ऑगस्टमध्ये घडली, तेव्हापासून आपत्ती निवारण्याच्या यंत्रणेचा मुद्दा चर्चेत आला.

जिल्हा प्रशासनाकडे बोट नसल्यानेच गावकऱ्यांनी तोकड्या क्षमतेच्या बोटीचा वापर केल्यानेच ही घटना घडल्याचे तपासातून निष्पन्न झाले होते. मुळातच, राज्यात सक्षम बोटी नसल्याची बाब यानिमित्ताने अधोरेखित झाली. त्यावरून सरकारच्या कार्यक्षमतेकडे बोटही दाखविले गेले. या घटनेपासून धडा घेतलेल्या राज्य सरकारने यंदा मात्र, बोटी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातही एकाच वेळी राज्यातील बहुतांशी म्हणजे, ज्या जिल्ह्यांत पुराचा धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे, अशा ठिकाणी तातडीने बोटी आणि अन्य सुरक्षिततेचे साहित्य पुरविण्यात येणार आहे.

राज्यातील गावे, शहरांना पुराचा धोका निर्माण झाल्यास सुरक्षिततेचे उपाय करीत आहोत. यंदा प्राधान्याने बोटी पुरविण्याचे नियोजन आहे.
- विजय वडेट्टीवार, राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT