Uddhav-Thackeray 
महाराष्ट्र बातम्या

पायाभूत प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही - उद्धव ठाकरे

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई - मुंबईतील पायाभूत प्रकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारीक नजर आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि परिसरातील पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करायचेच. या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सोमवारी मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थित प्रकल्पांचे सादरीकरण आणि आढावा घेण्यात आला. यामध्ये ८० हजार कोटींच्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली. या प्रकल्पांच्या कामाची विद्यमान परिस्थितीविषयी सांगण्यात आले. आतापर्यंत झालेला खर्च, प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, त्यावरील खर्च याबाबत सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी ठाकरे यांना दिली. या वेळी प्रकल्पासह राज्यातील रस्त्यांची स्थिती, त्यावर वार्षिक दुरस्तीसाठी येणारा खर्च याबाबतदेखील चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे प्रगतिपथावर आहेत. मेट्रोसह वर्सोवा बांद्रा सागरी सेतू, ठाणे खडीपूल क्रमांक-३, भिवंडी कल्याण शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण या प्रमुख प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. याचबरोबर नागपूर-ते मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा येथे वळण मार्ग-बोगद्यासह या प्रकल्पांच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यात आला. 

नवीन घोषित केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या एक हजार ६२१ कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे दुपदरी व चौपदरी काँक्रिटीकरणाच्या कामाच्या निधीबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगितले.

मुंबईतील पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने झाली पाहिजेत. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अधिकाऱ्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मला स्पष्ट भाषेत सांगावे. मात्र, कामे वेगाने झाली पाहिजेत.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam: तलाठी अन् गट 'क' पदांसाठी घेतली जाणारी परीक्षा आता थेट पुढच्या वर्षी! जाणून घ्या नवी तारीख

8th pay commission : १२ लाख कर्मचाऱ्यांना होणार मोठा फायदा ! १८ हजार रुपये बोनससह महागाई भत्ता अन् बरंच काही...

Gold Rate Today: सणाआधी सोन्याच्या भावात मोठा बदल! खरेदीआधी पाहा तुमच्या शहरातील 10 ग्रॅमचा ताजा भाव

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Success Story: जिल्हाधिकारी होण्याचं बालपणीचं स्वप्न... अपयश आलं, नोकरी सोडली, पण जिद्द सोडली नाही; ऐश्वर्यम UPSCत देशात १०वी

SCROLL FOR NEXT