Narendra modi and Eknath Shinde  
महाराष्ट्र बातम्या

India vs Bharat : राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत'! CM शिंदेंकडून 'भारत माता की जय' म्हणत बदलाचे स्वागत

रवींद्र देशमुख

मुंबई - केंद्र सरकारने G-20 परिषदेसाठी जाहीर केलेल्या राजपत्रावर 'इंडिया' ऐवजी 'भारत' असा उल्लेख केला आहे. या बदलावर अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. इंडिया ऐवजी भारत नाव वापरणे अभिमानास्पद असल्याच्या प्रतिक्रिया येत असताना विरोधकांकडून यावर टीकाही करण्यात आली आहे. त्यातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बदलाचे स्वागत केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून म्हटलं की, राजपत्रावर इंडिया ऐवजी भारत असा उल्लेख निश्चितच अभिमानास्पद आहे. देशाच्या राज्यघटनेमध्येच India that is 'Bharat' असा स्पष्ट उल्लेख असून राज्यघटनेने देखील हे नाव मान्य केले आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 'भारतमाता की जय' हीच घोषणा प्रत्येक देशवासियांच्या मुखातून ऐकू येत होती.

साने गुरुजींनी देखील बलसागर भारत होवो विश्वात शोभूनी राहो…असेच आपल्या कवितेद्वारे देशाचे वर्णन केले. हजारो स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाने स्वतंत्र झालेल्या देशाला 'भारत' या नावाने ओळखले जावे हे अभिमानास्पद आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हा निर्णय घ्यायचे ठरवले असल्यास या निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. भारतमाता की जय, असं शिंदे यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT