solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यापीठाचे प्राध्यापकांना निर्देश! परीक्षेनंतर 5 दिवसांत उत्तरपत्रिका तपासा; परीक्षेला विलंब, सर्वजण निवडणूक कामात; निकाल वेळेत लावण्याचे विद्यापीठाचे नियोजन

मार्चअखेर सुरू होणारी विद्यापीठाची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू झाली, १० मेपूर्वी संपणारी परीक्षा आता ३१ मेपर्यंत संपणार आहे. त्यानंतर १३ जूनपासून विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने उत्तरपत्रिका तातडीने तपासून निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : मार्चअखेर सुरू होणारी विद्यापीठाची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू झाली, १० मेपूर्वी संपणारी परीक्षा आता ३१ मेपर्यंत संपणार आहे. त्यानंतर १३ जूनपासून विद्यापीठाचे शैक्षणिक वर्ष सुरु होणार असल्याने उत्तरपत्रिका तातडीने तपासून निकाल वेळेत लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने नियोजन केले आहे. पेपर झाल्यानंतर पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे निर्देश विद्यापीठाने प्राध्यापकांना दिले आहेत.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा सध्या नेमक्या निवडणूक काळात सुरु आहेत. कर्मचारी प्रशिक्षणामुळे ६,७ व ८ एप्रिलला होणारे पेपर पुढे ढकलण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता एप्रिलअखेर आणखी एकदा कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण होणार असून त्यावेळी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पेपर घेतले जाणार आहेत. तरीपण, आगामी शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरु करण्यात येणार असल्याने उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत पूर्ण करून निकाल जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. विद्यापीठातील कॅम्पस व संलग्नित १०८ महाविद्यालयांमधील ६५ हजार विद्यार्थ्यांच्या जवळपास तीन लाख उत्तरपत्रिका अवघ्या काही दिवसांत प्राध्यापकांना तपासून पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठाचे अधिकारी पेपर झाल्यानंतर सातत्याने उत्तरपत्रिकांची तपासणीचा आढावा घेत आहेत.

पेपर तपासणीचे नियोजन

  • १) प्रथम वर्षाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी प्रत्येक महाविद्यालय स्तरावरच होईल.

  • २) द्वितीय व तृतीय वर्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी बार्शी, पंढरपूर, सोलापूर येथील कॅप सेंटरवर सुरू आहे.

  • ३) इंजिनिअरिंग, फार्मसी, लॉ, शिक्षणशास्त्र या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी ऑन स्क्रीन होणार आहे.

पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे अपेक्षित

पेपर झाल्यापासून पाच दिवसांत उत्तरपत्रिका तपासणे अपेक्षित आहे. सर्वांनी वेळेत पेपर तपासून पूर्ण केल्यास निकाल वेळेत लावता येणार असून त्यादृष्टीने सर्वांना सूचना केल्या आहेत. कुलगुरू, प्र- कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम वर्ष व अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे निकाल पहिल्यांदा लावण्याचे नियोजन आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

‘पीएम उषा’चे पथक विद्यापीठ दौऱ्यावर

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियानाअंतर्गत (पीएम- उषा) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरे महिला विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद या चार विद्यापीठांना प्रत्येकी 100 कोटी रुपये मिळणार आहेत. या निधीमुळे योजनेअंतर्गत विद्यापीठांना विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणे तयार करणे, विद्यापीठांच्या भौतिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांवर अधिक दृढपणे काम करणे, विविध प्रकल्पांना निधी मिळणार आहे. त्याअनुषंगाने काही दिवसात ‘पीएम-उषा’चे अधिकारी सोलापूर विद्यापीठाला भेट देणार आहेत. सध्या विद्यापीठात त्याची लगबग देखील सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT