zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

मोठी बातमी! शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या अन्‌ शिक्षक भरती ३१ मेपूर्वी; संचमान्यता १० फेब्रुवारीपर्यंत अंतिम; पहिल्यांदा अतिरिक्तचे समायोजन

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या यंदा ३१ मेपूर्वी होणार आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत संचमान्यता अंतिम होऊन पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. शेवटी ८० टक्के निकषांप्रमाणे शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या यंदा ३१ मेपूर्वी होणार आहेत. १० फेब्रुवारीपर्यंत संचमान्यता अंतिम होऊन पटसंख्येनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. शेवटी ८० टक्के निकषांप्रमाणे शिक्षकांची रिक्त पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार ७७५ शाळा आहेत. त्याअंतर्गत नऊ हजार शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या सुमारे २०० शाळांची पटसंख्या २० पेक्षाही कमी आहे. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळांमधील शिक्षक तात्पुरत्या स्वरूपात अध्यापन करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या जास्त असून त्याप्रमाणात शिक्षक नाहीत. त्यामुळे ३१ मेपूर्वी शिक्षक भरती होणार आहे.

१५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार पहिल्यांदाच संचमान्यता अंतिम झाल्याने हजारो शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त होतील आणि नव्या शिक्षक भरतीत देखील पदे कमी होतील, असा अंदाज वर्तविला जात आहे. पटसंख्येच्या नव्या निकषांमुळे अनेक शिक्षकांना अतिरिक्त होण्याची चिंता सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरसह राज्यातील सर्व शिक्षकांचे संचमान्यतेकडे लक्ष लागले आहे.

पहिल्यांदा अतिरिक्त शिक्षकांचे होईल समायोजन

यंदा ३१ मेपूर्वी शिक्षकांच्या आंतरजिल्हा, जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. सोलापूर जिल्हा परिषदेतील अंदाजे १६०० शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदल्या होतील. आता संचमान्यता अंतिम टप्प्यावर असून त्यात अतिरिक्त ठरलेल्यांचे पहिल्यांदा समायोजन होईल. त्यानंतर बदल्या, शिक्षक भरती अशा कार्यवाही होतील.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

कंत्राटी शिक्षक भरतीला ब्रेक

सोलापूर जिल्हा परिषदेच्या १० व २० पटाच्या शाळांवर कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सुमारे ८० सेवानिवृत्त शिक्षकांना त्या शाळांवर नेमले जाणार होते. मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कंत्राटी शिक्षकांची भरती थांबली. आता संचमान्यता अंतिम झाल्याने नव्या शिक्षकांचीच भरती होणार आहे. त्यामुळे कंत्राटी भरती होणार नाही, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sound System Ban : देव-देवतांच्या मिरवणुकीत आता 'या' गोष्टींना नो एन्ट्री; सरकारने काय दिले संकेत? संस्कृती जपण्यासाठी उचलणार कठोर पाऊल!

CIDCO: आनंदाची बातमी! सिडकोने गृहकर्ज मर्यादा वाढवली; आता घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार, व्याजदर अन् नवीन लिमिट किती?

Gudi Padwa 2026: भोपाळमध्ये 'मराठी' थाट! मुख्यमंत्र्यांनी घातली पेशवाई पगडी; ढोल-ताशांच्या गजरात गुढी उभारून केले नववर्षाचे स्वागत

Crime News : नाशिकमध्ये गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! सातपूरमध्ये २५ लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांना बेड्या

Prajwal Revanna Case : 13 हजार पानांचं आरोपपत्र, 70 पेनड्राइव्ह, 39 आरोपी अन् अंगावर काटा आणणारे पुरावे; माजी खासदाराच्या 'त्या' अश्लील व्हिडिओंचं सत्य समोर!

SCROLL FOR NEXT