PhD education sakal
महाराष्ट्र बातम्या

‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मुलाखत बंधनकारक! विद्यापीठ घेणार 15 जूनपूर्वी ‘पेट’ परीक्षा; परदेशातील विद्यार्थ्यांसह राज्यभरातील विद्यार्थ्यांनाही देता येणार ऑनलाइन परीक्षा

पेट दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील ७० टक्के गुण आणि मुलाखतीचे ३० टक्के गुण धरून त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. सेट-नेट, गेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेट बंधनकारक नाही, पण त्यांना मुलाखत द्यावी लागेल. त्यांचे पदवीचे ७० टक्के व मुलाखतीचे ३० टक्के गुण एकत्रित करून त्यांचीही गुणवत्ता यादी जाहीर होईल.

सकाळ डिजिटल टीम, तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आता १५ जूनपूर्वी पेट परीक्षा घेणार असून ही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. दरम्यान, पेट दिलेल्या विद्यार्थ्यांना या परीक्षेतील ७० टक्के गुण आणि मुलाखतीचे ३० टक्के गुण धरून त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. सेट- नेट, गेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पेट बंधनकारक नाही, पण त्यांना मुलाखत द्यावी लागेल. त्यांचे पदवीचे ७० टक्के व मुलाखतीचे ३० टक्के गुण एकत्रित करून त्यांचीही गुणवत्ता यादी जाहीर होईल. गुणवत्ता यादीनुसार संबंधितांना ‘पीएच.डी’ला प्रवेश मिळणार आहेत.

‘पीएच.डी’ला प्रवेश घेण्यापूर्वी ‘पेट’ द्यावी लागते. सेट, नेट व गेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ‘पेट’ देण्याची आवश्यकता नाही. पण, पदवीचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रित करून सर्वांचीच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यावर त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना ‘पीएच. डी’ला प्रवेश दिले जाणार आहेत. पदव्युत्तर पदवीला शिकणाऱ्या द्वितीय वर्षातील (शेवटच्या सत्रातील विद्यार्थी) विद्यार्थ्यांनाही पेट देता येणार आहे. सध्या या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असून २४ मे रोजी त्यांची परीक्षा संपणार आहे. तोपर्यंत लोकसभा निवडणुकीचा टप्पा देखील संपलेला असेल. त्यानंतर ‘पेट’चे युद्धपातळीवर नियोजन केले जाणार आहे.

सोलापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांनाही परीक्षा देता यावी म्हणून त्या त्या जिल्ह्यात ऑनलाइन केंद्रांची सोय केली जाणार आहे. तसेच परदेशातील इच्छुक विद्यार्थ्यांना ‘पेट’साठी, पुन्हा मुलाखतीसाठी याठिकाणी यायला लागू नये म्हणून पेट व मुलाखत ऑनलाइन देता येणार आहे. त्यादृष्टीने देखील विद्यापीठाने पहिल्यांदाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

मेरिट यादीनुसार मिळतील प्रवेश

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठातर्फे जून महिन्यात ‘पेट’ घेण्याचे नियोजन आहे. नेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पदवीचे ७० टक्के गुण व मुलाखतीचे ३० गूण आणि इतर ‘पेट’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे एंट्रन्स ७० टक्के गुण व मुलाखतीचे ३० टक्के गुण, यातून मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार विद्यार्थ्यांना ‘पीएच.डी’साठी प्रवेश मिळतील. देश, समाजहिताचे विषय मार्गदर्शक प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना देणे अपेक्षित आहेत.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र- कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

विद्यापीठात ‘पीएच.डी’च्या ४७० जागा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे जूनमध्ये ‘पेट‘ (पीएच.डीपूर्व चाचणी) घेतली जाणार आहे. त्यात ‘पीएच.डी’च्या अंदाजे ४७० जागा असणार आहेत. एकूण जागांपैकी ७० ते ८० टक्के जागा स्थानिक (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत. तर उर्वरित २० ते ३० टक्के जागा बाहेरील अन्य विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतील. विद्यापीठाने यंदाची ‘पेट’ परदेशातील विद्यार्थ्यांसह राज्यातील विविध विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांना देणे सोयीचे होईल, असे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : हिंसाचारात होरपळून निघालेल्या मणिपूरला पंतप्रधान मोदी आज देणार भेट

Mumbai : अभिनेत्रीनं धावत्या लोकलमधून मारली उडी, डोक्याला अन् पाठीला गंभीर दुखापत; रुग्णालयात उपचार सुरू

ENG vs SA 2nd T20 : इंग्लंडचा T20I मधील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला; नोंदवले एकापेक्षा सरस रेकॉर्ड

Nagpur News: रेल्वेच्या छतावर चढताच विजेचा धक्का; युवकाची प्रकृती चिंताजनक, रेल्वे स्थानकावरील घटना

मोठी बातमी! पगारावरील शिक्षकांनाही द्यावी लागणार ‘टीईटी’; सुप्रिम कोर्टाच्या निकालावर राज्य सरकार गप्पच; महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद घेणार २३ नोव्हेंबरला ‘टीईटी’

SCROLL FOR NEXT