Investigation of those 2 important cases in state is now with the CBI esakal
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील त्या २ महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास आता सीबीआयकडे

सरकार बदलताच महाविकास आघाडीला धक्का

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याच्या प्रकरणाचा तपास ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांना दिला होता. दरम्यान, सरकार बदलताच ही प्रकरणे आता सीबीआयकडे सोपवण्यात आली आहेत. याप्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहभागाची चौकशीदेखील पोलिसांनी केली आणि त्यांचा जबाब नोंदवला होता.

राज्याच्या गुप्तचर विभागाकडून गंभीर आणि संवेदनशील कॉल रेकॉर्डिंगशी संबंधित माहिती लीक झाल्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने राज्य पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिसांनी यासंदर्भात मार्च २०२२ मध्ये अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. सरकारच्या कामकाजाशी संबंधित गुप्त माहिती लीक होत असून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला अनेक लोकांचे फोन टॅप करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून फोन टॅपिंग होत असल्याचा आरोपदेखील करण्यात आला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होताच हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे.

तर अन्य दुसऱ्या प्रकरणात भाजप नेते गिरीश महाजन आणि अन्य २८ जणांविरुद्ध खंडणी व गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या २८ आरोपींनी पुणे पोलिसांवर केलेल्या आरोपांची चौकशीही सीबीआय करणार आहे. या प्रकरणाचा तपासही सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT