ips deepak pandey chris gayle dance video goes viral check here  
महाराष्ट्र बातम्या

Video : IPS दीपक पांडेंचा अनोखा अंदाज, ख्रिस गेलसोबत धरला ठेका...

विनोद बेदरकर

नाशिक : राज्यातील बहुचर्चित वरिष्ठ आयपीएस दीपक पांडे पुन्हा एकदा चर्चेत आहेत, यावेळी मात्र त्यांचे नृत्य हे चर्चेचे कारण आहे. क्रिकेट विश्वातील युनिव्हर्सल बॉस म्हटला जाणारा क्रिकेटर ख्रिस गेल याच्या सोबतचा त्यांच्या नृत्याचा भन्नाट व्हिडियो सध्या जोरात व्हायरल झाला आहे. (ips deepak pandey chris gayle dance video goes viral)

नाशिकला पोलीस आयुक्त असताना त्यांनी राबवलेले धडाकेबाज अफलातून निर्णय अन् मोहिमांमुळे दीपक पांडे चर्चेत राहिले. कधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेसाठी पथक पाठवले म्हणून तर कधी पोलि‍सांच्या अंत्ययात्रेत खांदा दिला म्हणून तर कधी हेल्मेट सक्ती आणि पोस्टर बॅनर बंदीसह नियमित गोदास्नानामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी राहतानच दीपक पांडे यांनी संवेदनशीलतेबाबत कर्तव्य कठोरतेचे दर्शन घडवले.

राजकारण्यांशी काही मुद्द्यावर मतभेद होऊ लागताच त्यांनी थेट साईट ब्रांचला बदलीसाठी अर्ज केल्यानंतर त्यांच्या मुंबईतील बदलीनंतर चर्चा काही त्यांचा पिच्छा सोडेना असाच प्रकार पुढे आला आहे.

पांडे आणि वेस्ट इंडिजचा माजी किक्रेटपटू ख्रिस गेलसोबत चक्क पाश्चात्य संगीतावर थिरकतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंद प्रकाश, पाश्चात्य संगीताच्या तालावर ख्रिस गेलसोबत पांडे वेस्टर्न डान्स करताना त्या व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT