Vishwas Nangare Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटलांना प्रमोशन; राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झालेल्या आहेत. यामध्ये १५ पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश असून शासनाचे सहसचिव यांच्या आदेशाने या बदल्या झालेल्या आहेत.

मुंबईचे सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील यांचं प्रमोशन झालेलं असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ते अपर पोलिस महासंचालक झालेले आहेत. विनयकुमार चौबे यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागेवर नांगरे पाटलांची वर्णी लागली आहे.

हेही वाचाः इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेश कुमार पुण्याचे नवीन पोलीस आयुक्त असणार आहेत. 

यासह मीरा भाईंदर, वसई-विरारचे पोलिस आयुक्त सदानंद दाते यांची बदली मुंबईच्या दहशतवादी पथकात झाली आहे. ते अपर पोलिस महासंचालक म्हणून पदभार सांभाळतील. मुंबईचे विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलिंद भारंबे यांचं प्रमोशन झालेलं असून ते नवी मुंबईचे पोलिस आयुक्त झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan-Dombivli meat sale ban: मांस विक्रीवरील बंदीच्या निर्णयावर 'कल्याण-डोंबिवली' महापालिका आयुक्त गोयल ठाम!

Sanju Samson साठी राजस्थान रॉयल्सने सुरू केली दुसऱ्या संघाची शोधाशोध; CSK संघ शर्यतीतून बाहेर?

Bihar SIR: बिहारची एसआयआर मोहीम मतदारांप्रती अनुकूल; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

Pune Metro Update: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! १५ ऑगस्टपासून मेट्रो गर्दीच्या वेळी दर सहा मिनिटांनी धावणार

Latest Marathi News Updates Live: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

SCROLL FOR NEXT