Eknath Shinde 
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide : आतापर्यंत २० जणांचा मृत्यू, दुर्दैवाने यंत्र...; मुख्यमंत्र्यांचं सभागृहात निवदेन

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजुनही बचावकार्य सुरू असून आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली. शिंदे यांनी घटनस्थळी भेट देऊन आल्यानंतर तिथली परिस्थिती सांगितली.

एकनाथ शिंदे म्हणाले की, खालापूरजवळील इर्शाळवाडीमध्ये रात्री ११.३५ दरड कोसळली होती. तातडीने तिथे बचाव पथक पाठवली होती. आपली यंत्रणा १२.४० वाजता घटनास्थळी पोहोचली होती. घटनास्थळी NDRFच्या चार टीम पोहोचल्या. स्थानिक बचाव पथकाच्याही पाच टीम आहेत. घटनेची माहिती मिळताच मी, गिरीश महाजन, उदय सामंत, दादा भुसे हे तात्काळ रात्री निघालो होतो. रात्री तीन वाजता घटनास्थळी पोहोचलो होतो.

रात्रीच्या स्थिती होती आणि उंच डोंगर होता. सकाळी पोहोचल्यावर त्यांना बाहेर काढणे ही महत्वाची कामगिरी होती. त्यातच दुर्दैवाने तिथं यंत्र पोहचवण्याची परिस्थिती नव्हती. शिवाय ते दरड प्रवण गाव नव्हते. गावातील सर्व लोकांची तातडीची व्यवस्था शाळेत केली आहे. आता ५० ते ६० कंटेनर मागवले आहे. सध्या ३० कंटेनर उपलब्ध झाल्याची माहिती शिंदे यांनी सभागृहाला दिली.

दरम्यान निर्वासित झालेल्या लोकांची कायमची व्यवस्था कऱण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. त्यांच्यासाठी जागा निश्चित केली असून सिडकोलाही सांगितलं आहे. त्यांना आवश्यक सुविधा देण्याच्या सूचना केल्या आहेत. आज कॅबिनेटमध्ये देखील अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी लोकांना शिफ्ट करण्यासाठी धोरण निश्चित केल्याचं शिंदेंनी सांगितलं.

सत्ताधारी असो वा विरोधी पक्षाचे नेते असो, सर्वांना सहकार्याची भूमिका घेतली. माणुसकी काय असते हे दाखवून दिलं. सरकारला विरोधकांनी सहकार्य केल्याचं शिंदे यांनी नमूद केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT