Uddhav Thackeray: esakal
महाराष्ट्र बातम्या

Irshalwadi Landslide : आदित्य ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे इर्शाळवाडीचा दौरा करणार; ठाण्यातील मेळावा रद्द

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडीत बुधवारच्या रात्री कोसळलेल्या दरडीमुळे आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला असून शंभरपेक्षा जास्त जणांचा शोध सुरु आहे. आजची शोधमोहीम थांबवण्यात आलेली आहे. उद्या पहाटे पुन्हा काम सुरु होणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाण्यात उद्या संध्याकाळी होणारा ठाकरे गटाचा मेळावा रद्द करण्यात आलेला आहे. पाऊस आणि इर्शाळगड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मेळावा रद्द करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

उद्धव ठाकरे हे उद्या इर्शाळवाडीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. घटनेच्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देवून दुर्घटनाग्रस्तांना धीर दिला होता. शिवाय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही इर्शाळवाडीला भेट दिली होती.

दरम्यान, उद्या उद्धव ठाकरे इर्शाळवाडीला भेट देणार असून पीडित कुटुंबांशी ते संवाद साधणार आहेत. संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गावचं कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची घोषणा केली आहे.

स्थानिक माहितीवरून सदरील आदिवासी वाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब वास्तव्यास असून लोकसंख्या २२८ इतकी आहे. त्यातील सुमारे १७ ते १८ घरांवर दरड कोसळी आहे. बचाव कार्यात शंभरपेक्षा जास्त व्यक्तींना सुरक्षित वाचविण्यास यश आले आहे.

२२८ पैकी उर्वरित १०९ व्यक्तीचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडग्रस्त ठिकाणाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. त्यानंतर आता अशा संभाव्य गावांचा सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT