sakal exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

मराठी भाषेबद्दल सरकार गंभीर नाही का? ‘कन्नड’साठी कर्नाटक सरकारकडून विद्यार्थ्यांना २५००० फलोशिप अन्‌ ‘मराठी’साठी महाराष्ट्र सरकारकडून ठेंगा

राजभाषा विभाग शासनमान्यच असावा असा नियम आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मराठी भाषा विभागाला सहा वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यताच मिळालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपयांचे शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतोय.

तात्या लांडगे

सोलापूर : राजभाषा विभाग हा शासनमान्यच असावा असा प्रत्येक राज्यातील नियम आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील मराठी राजभाषा विभागाला सहा वर्षांपासून उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून मान्यताच मिळालेली नाही. त्यामुळे एमए-मराठी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार रुपयांचे शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागतोय. शासनाची मान्यता नसल्याने या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देखील मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राज्यात दरवर्षी लाखोंचा खर्च करून मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण, इंग्रजी माध्यमांकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल पाहता मराठीतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढणे जरुरी आहे. त्यासाठी शासनाकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळणे अपेक्षित आहे. मात्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्नाटक सरकारकडून दरवर्षी प्रोत्साहनपर प्रत्येकी २५ हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते.

पण, महाराष्ट्रातील विद्यार्थी सोलापूर विद्यापीठात मराठीतून ‘एमए’चे शिक्षण घेताना त्याला मात्र ना शिष्यवृत्ती ना फेलोशिप मिळते, उलट त्याला प्रवेशासाठी पाच हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते, अशी स्थिती सोलापूर विद्यापीठातील आहे. मराठी राजभाषा दिन साजरा करताना अशा विदारक स्थितीचा देखील सरकारने विचार करावा, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना आहे.

पाठपुरावा सुरू, लवकरच मान्यता मिळण्याची आशा

विद्यापीठातील मराठी राजभाषा विभागाला शासनाची मान्यता मिळावी, असा प्रस्ताव यापूर्वीच शासनाकडे पाठविला आहे, पण अजून त्याला मान्यता मिळाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा सुरू असून लवकरच मान्यता मिळेल, अशी आशा आहे.

- डॉ. प्रकाश महानवर, कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

कर्नाटककडून ‘कन्नड’साठी फेलोशिप;

महाराष्ट्राकडून मराठीला शिष्यवृत्ती पण नाही

कन्नड माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी म्हणून कर्नाटक सरकारकडून एमए- कन्नडचे शिक्षण घेणाऱ्यांना दरवर्षी २५ हजार रुपयांची फेलोशिप दिली जाते. दुसरीकडे मात्र मराठी विषयातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांची पदरमोड करून प्रवेश घ्यावा लागतोय. सोलापूर विद्यापीठातील मराठी विभागाला २०१८-१९ पासून मान्यताच नाही. त्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीचा देखील लाभ मिळत नाही हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT