ISO Certification Sakal
महाराष्ट्र बातम्या

State Cooperative Bank : राज्य सहकारी बँकेस सुरक्षेचे 'आयएसओ' प्रमाणपत्र

कोणत्याही संस्थेस विशेषत आर्थिक संस्थेस 'आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक' प्राप्त होणे ही अभिमानाची बाब असते.

सकाळ वृत्तसेवा

कोणत्याही संस्थेस विशेषत आर्थिक संस्थेस 'आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक' प्राप्त होणे ही अभिमानाची बाब असते.

पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेस आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने (आयएसओ) मार्च २०२३ मध्ये ऑडिट करुन बॅंकेस दिलेले हे प्रमाणपत्र पुढील तीन वर्षांकरिता वैध असून, या कालावधीत संस्थेतर्फे नियमित परिक्षण होणार आहे, अशी माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

अनास्कर म्हणाले, कोणत्याही संस्थेस विशेषत आर्थिक संस्थेस 'आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानक' प्राप्त होणे ही अभिमानाची बाब असते. ११२ वर्षांचा दैदिप्यमान इतिहासाचा वारसा जपत आधुनिकतेशी सांगड घालत राज्य बँकेने इतिहासात प्रथमच मिळविलेले आयएसओ 27001-2013 हे आंतरराष्ट्रीय सुरक्षेचे मानक, बँकेच्या प्रगतीचे द्योतक आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ग्राहकांच्या माहितीची सुरक्षा अतिमहत्वाची मानून बँकेने स्वतःच्या संगणक प्रणालीचे पायाभूत मजबुतीकरण केले आहे. याच व्यवस्थेच्या उत्कृष्ट उभारणीसाठी बँकेने आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रमाणपत्र प्राप्त केल्याने ग्राहकांना त्यांच्या व्यवहारांच्या सुरक्षेची हमी मिळाली, असेच म्हणावे लागेल. संगणक प्रणालीचे मुलभूत व महत्वाचे कार्य हे ग्राहकांच्या माहितीची सुरक्षा, गोपनीयता व अखंड उपलब्धता या त्रिसुत्रीवर अवलंबून असते.

सध्या होत असलेले सायबर हल्ले पाहता भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने बॅंकेने आपल्या संगणक विभागात अत्युच्च दर्जाची यंत्रणा उभी करत स्वतंत्रपणे वाशी, नवी मुंबई येथे सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर उभारणीचे काम हाती घेतले आहे. याचा फायदा भविष्यात सर्व सहकारी बँकांना उपलब्ध करुन देण्याचा बँकेचा मानस आहे. याबाबत राज्य बँकेची सर्व धोरणे आणि कार्यप्रणाली आयएसओ मानांकनानुसार निश्चित करण्यात आली आहेत. ती अधिक सुरक्षित व कार्यक्षम झालेली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SCROLL FOR NEXT